“शिवसेनेशी युतीबाबत राज ठाकरे निर्णय घेतील”, बाळा नांदगावकरांचे वक्तव्य

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आपल्या हिप बोनच्या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा एकदा ॲक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत.

“शिवसेनेशी युतीबाबत राज ठाकरे निर्णय घेतील”, बाळा नांदगावकरांचे वक्तव्य

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आपल्या हिप बोनच्या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा एकदा ॲक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. आज त्यांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. तर उद्या २३ ऑगस्टला मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडणार आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने या बैठकांना विशेष महत्त्व आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेने पक्ष २५ तारखेपासून राज्यभरात सदस्य नोंदणी सुरु करणार आहे. या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचे आदेश दिले आहेत. जास्तीत जास्त लोकांची नोंदणी करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत.

हे ही वाचा :- शिवसेना आणि मनसे युती ? आज राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांन सोबत बैठक 

राज ठाकरे यांनी म्हंटले की, लोकं सध्याच्या राजकारणाला कंटाळले आहेत, लोकं आपल्याला मत देण्यास तयार आहेत. लोकं आपला विचार करत आहेत. म्हणून लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचे आहे. सदस्यता नोंदणीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचा. आपण केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवा. वेगवेगळे कार्यक्रम घेऊन लोकांना पक्षाशी जोडा. योग्य रित्या काम केल्यास यंदा आपल्याला नक्की यश मिळेल, असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदेंनी बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे (uddhav-thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे पुन्हा एकत्र येणार का? याबाबत राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी काल एक सुचक विधान केले होते. त्याबाबत आज मनसे नेते बाळानांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेशी युती करण्याबाबत राज ठाकरेच निर्णय घेतील, असे ते म्हणाले. पुढे बाळा नांदगावकर म्हणाले , “शिवसेनेशी युतीबाबत राज ठाकरे निर्णय घेतील”. मी त्यावर भाष्य करणं योग्य नाही. कारण यापूर्वी हे सर्व प्रयोग करून झालेले आहेत”. दरम्यान आजच्या बैठकीत पक्षाच्या संघटनेबाबत सविस्तर चर्चा झाली असून उद्या संपूर्ण राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर राज ठाकरे स्वत: माध्यमांशी संवाद साधतील. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

 

हे ही वाचा :-

मुख्यमंत्रीसुध्दा थेट जनतेतूनच निवडून द्या, अजित पवारांचा टोला

विरोधी पक्षाकडून सत्ताधारी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.
Exit mobile version