spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवाजी महाराजांवर लवकरच सिनेमा काढणार, राज ठाकरेंची मोठी घोषणा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आगामी काळात चित्रपट काढणार असून तो दोन ते तीन भागांमध्ये येईल. आताच त्याविषयी काही सांगणार नाही.

प्रसिद्ध मराठी अभिनेता सुबोध भावेनं हर हर महादेव या चित्रपटाच्या निमित्तानं मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या मुलाखतीत बोलत असताना राज ठाकरेंनी ते भविष्यात शिवाजी महाराजांवर चित्रपट काढतील अशी घोषणा देखील केली. राज ठाकरे म्हणाले, आपण शिवाजी महाराज वेगळ्या प्रकारे समजून घ्यायला हवेत. महाराजांचे विचार जाणून घ्यायला पाहिजे. मला नेहमी वाटतं अफझल खान, वेगवेगळ्या लढाया यांच्यापलीकडे शिवाजी महाराज आहेत. आपण जर केवळ त्या चार ते पाच प्रसंगात अडकलो तर अवघड होईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आगामी काळात चित्रपट काढणार असून तो दोन ते तीन भागांमध्ये येईल. आताच त्याविषयी काही सांगणार नाही. अशी घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे

या मुलाखतीमध्ये राज यांनी आपल्या चित्रपट विषयक वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला आहे व्हॉईसओव्हर राज म्हणाले, हर हर महादेव हाच चित्रपट का, मी पहिल्यांदा व्हाईस ओव्हर दिला होता तो २००३ मध्ये बाबासाहेब पुरंदरे यांची मुलाखत घेतली होती तेव्हा. ती जबाबदारी अचानक माझ्य़ावर आली होती. व्हाईस ओव्हर देणे हे माझे काम नाही. मी त्याचा कधीही विचार केला नाही. २००४ मी शिवसेनेचे कॅम्पेन केले होते. त्या ९ फिल्म्सचा आवाज अजित भुरे यांचा होता. मुंबईवरील बॉम्बस्फोटाच्या एका अॅड फिल्मला माझा आवाज होता. फिल्म झाली बाळासाहेबांना त्या आवडल्या.

चित्रपट बनवणे हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मला तो आवडला तो मी वेगवेगळ्या अँगलनं पाहिला आहे. गांधी हा चित्रपट मी किती वेळा पाहिला असेल मलाच माहिती नाही. यावरुन माझी पत्नी मला नेहमीच टोकते. चित्रपटाची मला आवड आहे. चित्रपट हा एक सामुहिक सहभागाचा प्रयत्न असतो. खूप लोकांचे कष्ट असतात. त्या सगळ्या प्रयत्नांपैकी व्हाईस ओव्हर हा एक भाग आहे. तो काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी मी व्हाईस ओव्हर दिला आहे.

तसेच त्यांनी त्यांच्या कॉलेजच्या आठवणींना देखील यावेळी उजाळा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा प्लाझाला गांधी चित्रपट लागला होता. कॉलेजच्या काळात पहिल्यांदाच असा मनात आला की एवढी भव्य चित्रपट शिवाजी महाराजांवर यायला हवा. त्यानंतर मी वाचायला सुरुवात केली. नंतर लक्षात आले की, छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट होऊ शकत नाही. कारण ती खूप मोठी गोष्ट आहे. मी त्याविषयी अनेकांना विचारणाही केली होती. मात्र आता आपण स्वत: महाराजांवर चित्रपट काढण्याची विचार करतो आहोत.

हे ही वाचा:

Har Har Mahadev : “भगवा ज्याचा श्वास तो मराठी…” राज ठाकरे ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा एक भाग

Har Har Mahadev : ‘हर हर महादेव’ चित्रपटातील नवं गाणं रिलीज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss