राज ठाकरेंचं उध्दव ठाकरेंवर टीकास्त्र

राज ठाकरेंचं उध्दव ठाकरेंवर टीकास्त्र

आज पनवेलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS)मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाषण करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) उध्दव ठाकरेंना (Uddhav Thackeray) खडेबोल सुनावले आहेत. ‘खोके खोके ओरडणाऱ्यांकडे तर कंटेनर आहेत. प्रत्येक वेळी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन जनतेला इमोशनल करण्यात येत. यांनी कोवीडसुध्दा सोडला नाही. निवडणुक तोंडावर आली की हेच तुमच्याकडे येणार आणि कुणालातरी दाखवणार’, असा टोला राज ठाकरेंनी पनवेलमधील मेळाव्यात बोलताना उध्दव ठाकरेंना लगावला आहे. ‘एकनाथ शिंदे यांनी बंड केला होता. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. त्यांच्या या बंडानंतर त्यांना गद्दार म्हटले जाते. त्यासोबतच त्यांचा उल्लेख करताना ५० खोके एकदम ओके असा केला जातो आहे. पण या घोषणा ठाकरे गटानेच निर्माण केल्या आहेत. तसेच मविआ एकत्र असताना त्यांच्याकडूनही ह्याच घोषणा दिल्या जात होत्या. जे ५० खोके एकदम ओके अशा घोषणा देत आहेत त्यांच्याकडे कंटेनर्स आहेत.’ अशी टीका यावेळी राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर केली आहे. मुंबईला बरबाद होण्यासाठी मोठा काळ जावा लागला. पण पुणे बरबाद व्हायचे असेल तर फारसा वेळ लागणार नाही. मी अनेकवेळा पुण्यात सभा घेऊन हे सांगितले आहे. आमच्याकडे टाऊन प्लानिंग केले जातच नाही. आमच्याकडे तर फक्त डेव्हलपमेंट प्लॅन येतो. पुण्यात गुदमरलेला मराठी माणूस आहे. तसेच कोकणात सुध्दा कोणीही येतात आणि जमिनी विकत घेतात.’ असे भाष्यही राज ठाकरेंनी यावेळी मेळाव्यात केले.   YouTube video player ‘२०२०-२०२१ ला कलम ३७० कलम हटवण्यात आले. यानंतर काश्मीरमध्ये जमीन घेणे शक्य झाले आहे. जा तुम्हीही जाऊन तिथे जमिनी घ्या. पण अंबानी, अदाणी यांनीही अजून तिथे जामीन घेतलेली नाही हे लक्षात ठेवा. मणिपूर किंवा ईशान्यकडच्या राज्यांमध्ये जमीन घेता येत नाही. कारण तिथे तसे कायदे तयार करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात सगळे येऊ शकतात. इथे कुठलाही तसा कायदा नाही. या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्राला भोगावा लागत आहे. या सगळ्याचा दुष्परिणाम महाराष्ट्रातील सहन करत आहे’, असेही राज ठाकरेंनी यावेळी म्हटले आहे.   हे ही वाचा: टोलनाकासंदर्भात Amit Thackeray वर टीका करणाऱ्या भाजपाला Raj Thackeray नी दिले प्रत्युत्तर, म्हणाले… आंदोलनात साथ द्या आणि सत्ताधार्यांना…. राज ठाकरे MNS LIVE राज ठाकरे यांनी केले थेट जनतेला आवाहन बदल हवे असतील तर … Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version