spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अजित पवारांच्या शपथविधीनंतर राज ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, दिगू टिपणीस’ झाला…

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अनेक आमदारांसह एनडीएमध्ये प्रवेश केला आहे. या सर्व राजकीय नाट्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अश्य्क्ष राज ठाकरे यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे

आज संपूर्ण दिवसभरात राज्याच्या राजकारणात अनेक मोठं मोठ्या घडामोडी या होत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही घेतली आहे. एक वर्षानंतर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात एक मोठा भूकंप हा आला आहे. शिवसेनेत बंडखोरी होऊन वर्षभरानंतर आता राष्ट्रवादीत पुन्हा एकदा बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी अनेक आमदारांसह एनडीएमध्ये प्रवेश केला आहे. या सर्व राजकीय नाट्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे.

 आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला . उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच ! तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं. बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ?

राज ठाकरे

हे ही वाचा:

Prajakta Mali ने सह कलाकारासाठी शेअर केली खास पोस्ट, म्हणाली…

Delhi Cab Driver, एकाच टँक्सीमध्ये WiFi पासून Snacks सह सर्व सुविधा उपलब्ध

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss