Raj Thackeray : ‘भाजपने निवडणूक लढवू नये’ अंधेरी पोटनिवडणुकीबाबत राज ठाकरेंचे फडणवीसांना पत्र

Raj Thackeray : ‘भाजपने निवडणूक लढवू नये’ अंधेरी पोटनिवडणुकीबाबत राज ठाकरेंचे फडणवीसांना पत्र

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं होतं. गणेशोत्सवात राज ठाकरेंनी त्यांची भेटही घेतली होती. यामुळे मनसे आता भाजपासोबत युती करणार अशी चर्चा पुन्हा एकदा रंगली होती. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत नवं राजकीय समीकरण पहायला मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. परंतु मनपाच्या निडवणुकी आधी राज्याचे लक्ष वेधलं आहे ते अंधेरी पोटनिवडणुकीनं याबाबत एक मोठी बातमी सामोर येत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहला आहे. त्यात त्यांनी म्हटलं, “आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना नम्र आवाहन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणात्मक भूमिका. असे ठाकरेंनी या पत्राद्वारे आपली भूमिका मांडली आहे.

“एक विशेष विनंती करण्यासाठी हे पत्र आपणांस लिहितो आहे. आमदार कै. रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) या विधानसभेच्या जागेसाठी पोट निवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. दिवंगत रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. त्यामुळे माझी विनंती आहे की, भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं.”, असं भावनिक आवाहन राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पत्रातून केलं आहे.

हेही वाचा : 

Shahaji Bapu Patil : ‘ह्या’ दोन राऊतांनी आमचं वाटोळं केलं, भर सभेत शहाजी पाटलांचा दावा

Exit mobile version