राज ठाकरेंच्या सुपुत्राने केला दादर ते अंबरनाथ लोकल ट्रेन मधून प्रवास

राज ठाकरेंच्या सुपुत्राने केला दादर ते अंबरनाथ लोकल ट्रेन मधून प्रवास

राज ठाकरेंच्या सुपुत्राने केला दादर ते अंबरनाथ लोकल ट्रेन मधून प्रवास

मुंबई : सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मनसे पक्ष बळकट करण्यासाठी आणि अधिकाधिक तरुणांना पक्षासोबत जोडण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे सध्या राज्यातील विविध भागात दौरा करत आहेत. सध्या अमित ठाकरे हे अंबरनाथ दौऱ्यावर गेले असून तेथील तरुण पिढीला व मनसैनिकांना भेटणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने अमित ठाकरे यांनी दादर ते अंबरनाथ असा लोकल ट्रेनचा प्रवास केला आहे.

अमित ठाकरे यांचे आज अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर येथे मनसैनिकांसोबत व नागरिकांसोबत संवाद दौरा आहे. या दौऱ्यात ते विद्यार्थी, युवक-युवकिन सोबत संवाद साधणार आहेत. तसेच अमित ठाकरे यांच्या या दौऱ्याच्या वेळी अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी मनसे प्रवेश करणार आहेत. या दौऱ्यासाठी मुंबईहून निघालेले अमित ठाकरे यांनी दादरहून लोकल  ट्रेनने अंबरनाथ गाठले. खरंतर लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफ लाईन मानली जाते. मुंबईसह उपनगरातील चाकरमान्यांचा हा जिव्हाळ्याचा विषय आहे. अमित ठाकरे यांच्या लोकल प्रवासातील काही फोटो मनसे नेते गजानन काळे यांनी त्यांच्या ट्विटर हँडल वरून शेअर केले आहेत.

सकाळी अकराच्या सुमारास आम्ही ठाकरे यांचे अंबरनाथ येथे आगमन झाले. त्यानंतर अमित ठाकरे अंबरनाथ मधील ऐतिहासिक शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेत त्यांच्या पुढीलदौऱ्याला सुरुवात केली. अंबरनाथच्या रोटरी सभागृहात कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यानंतर बदलापूर आणि उल्हासनगर शहरांमध्ये जाऊन तरी दौरा करत तेथील मनसैनिकांची भेट घेतली.

हेही वाचा : 

स्ट्रॉबेरी दातांचा पिवळेपणा दूर करू शकते, जाणून घ्या कसे?

Exit mobile version