Amit thackeray : मोस्ट स्टायलिश पॉलिटिशन पुरस्काराचे मानकरी ठरले राज ठाकरेंचे सुपुत्र

Amit thackeray : मोस्ट स्टायलिश पॉलिटिशन पुरस्काराचे मानकरी ठरले राज ठाकरेंचे सुपुत्र

लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड २०२२ चा रंगतदार सोहळा काल मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांना लोकमतकडून यंदाचा लोकमत मोस्ट स्टायलिश पॉलिटिशन पुरस्कारानं गौरवण्यात आले. लोकमत समुहाचे मुख्य संपादक राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

हेही वाचा : 

Video Viral : भर गरबा कार्यक्रमात शिरलेल्या मुस्लिम तरुणाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण

या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर अमित ठाकरे आणि प्रसिद्ध अभिनेता तथा माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा चिरंजीव रितेश देशमुख यांच्यात भेट झाली. त्याची भेट होताच रितेश अमित ठाकरे यांना घट्ट मिठी मारली. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये दोघांमध्ये असलेली घट्ट मैत्र दिसत आहे. रेड कार्पटवरील रितेश आणि अमित यांची मैत्री चर्चेचा विषय ठरत आहे.

आशिष शेलारांनी शिवसेनेला लगावला खोचक टोला

पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर अमित ठाकरे म्हणाले की, हा माझ्या आयुष्यातील पहिला पुरस्कार आहे. मी मराठीत बोलतो. मला ४ दिवसापूर्वी हा पुरस्कार मला देत असल्याचं कळवण्यात आले. तेव्हा माझ्या मनात पहिला हा विचार आला की, नॉमिनीज कोण आहेत? असे कोण स्टायलिश पॉलिटिशन्स आहेत ज्यांच्यातून मला निवडून हा पुरस्कार देण्यात आला. पण इथे आल्यावर कळालं नॉमिनीज नाहीत. या पुरस्काराबद्दल मी लोकमतचे त्यांनी आभार मानले.

Rain Updates : परतीच्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरु; मराठवाड्यात पिकांचं नुकसान

Exit mobile version