राज ठाकरे यांची उद्धव ठाकरेंवर पहिलीच प्रतिक्रिया

फक्त सामान्य लोक नव्हे तर कलाकार मंडळी देखील याबाबत आपलं मत मांडताना दिसत आहेत. दरम्यान राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

राज ठाकरे यांची उद्धव ठाकरेंवर पहिलीच प्रतिक्रिया

सलग दहा दिवस सुरु असलेलं हे राजकीय नाट्य मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर संपलं आहे. अखेर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यात नवीन सरकार येणार हे नक्की झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. फक्त सामान्य लोक नव्हे तर कलाकार मंडळी देखील याबाबत आपलं मत मांडताना दिसत आहेत. दरम्यान राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी ट्विट मध्ये ”ज्या दिवशी माणूस आपल्या नशिबाला स्वतःच कर्तृत्व समजतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो”. अशी अप्रत्यक्ष टीका उद्धव ठाकरेंवर केली आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुंबई एरपोर्टवर दाखल झाले आहेत. ते दुपारी ३ वाजता राजभवनात भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत असं स्वतः शिंदे यांनी सांगितलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. उद्या नव्या सरकारकडून शपथ विधीचा मुहूर्त पार पडणार असल्याची माहिती समोर येतेय. मुंबईतील अनेक शिवसैनिकांना पोलिसांनी नोटस पाठविल्या असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती बिघडण्याची शक्यता असल्याने या नोटिसा देण्यात आल्या असून कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे.

Exit mobile version