राज ठाकरेंची ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांना दिली आदरांजली! सोशल मीडियावर पोस्ट होतेय व्हायरल

ब्रिटिश सत्तेचा सुवर्णकाळ आणि अस्ताला जाणाऱ्या साम्राज्याच्या साक्षीदार असलेल्या, ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर सात दशके विराजमान असणाऱ्या ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं काल वृद्धपकाळानं निधन झालं. त्या ९६ वर्षांच्या होत्या.

राज ठाकरेंची ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांना दिली आदरांजली! सोशल मीडियावर पोस्ट होतेय व्हायरल

ब्रिटिश सत्तेचा सुवर्णकाळ आणि अस्ताला जाणाऱ्या साम्राज्याच्या साक्षीदार असलेल्या, ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर सात दशके विराजमान असणाऱ्या ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II of Britain) यांचं काल वृद्धपकाळानं निधन झालं. त्या ९६ वर्षांच्या होत्या. स्कॉटलंडमधील बाल्मोरल कॅसल या ठिकाणी त्यांनी अंतिम श्वास घेतला ब्रिटीश राजघराण्याकडून आणि ब्रिटन सरकारकडून त्याचबरोबर जगातील अनेक देशांनी शोक व्यक्त केला जात आहे. अवघ्या जगातून हळहळ व्यक्त झाली. राणी एलिझाबेथ या दुसऱ्या महायुद्धापासून ते २१ व्या शतकाचे वारे जगात वाहायला लागेपर्यंतच्या इतिहासाच्या एकमेव साक्षीदार होत्या. त्यांच्या निधनानंतर एका युगाचा अंत झाल्याची प्रतिक्रिया अनेक स्तरातून व्यक्त होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) यांनी देखील त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट करत राणी एलिझाबेथ द्वितीय यांना आदरांजली दिली आहे.

राज ठाकरेंनी या पोस्टमधून राणी एलिझाबेथ यांच्या जीवनपटावर संक्षेपात प्रकाश टाकला आहे. तसेच, त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी, त्यांनी लीलया पेललेली आव्हाने, फक्त ब्रिटनच नव्हे, तर जगाच्या इतिहासात त्यांचं असलेलं महत्त्व, राजघराण्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले असताना त्यांनी दाखवलेला संयम अशा अनेक मुद्द्यांना राज ठाकरेंनी या पोस्टमध्ये हात घातला आहे. राज ठाकरेंची ही पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे.

हे ही वाचा :-    एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी ‘ऑपरेशन युनिकॉर्न’चे नियोजन

“कुठलाही राजमुकुट हा काटेरी असतो आणि तो कमालीचा एकटेपणा घेऊन येतो. हे एकटेपण ७० वर्ष सोसलेल्या एलिझाबेथ द्वितीय यांच्या शिरावरून हा मुकुट उतरला. एलिझाबेथ द्वितीय यांचं एक युग होतं, ते संपलं. आता नवीन युग सुरु होतंय? की राजघराण्याचा सूर्य मावळतोय? हे बघणं कुतूहलाच असेल. एलिझाबेथ द्वितीय ह्यांच्या स्मृतीस अभिवादन”, असं आपल्या पोस्टमध्ये शेवटी राज ठाकरे म्हणाले आहेत.

“ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन झालं. ७० वर्ष त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या. आणि ही ७० वर्ष कुठली? तर जगभरातून राजेशाही संपुष्टात आलेली असताना, जगभरात लोकशाहीचे वारे वेगाने वाहत असतानाची ७० वर्ष. युरोपमधली अनेक राजघराणी ही रक्तरंजित क्रांत्यांनी उलथवून टाकली गेली. पण ब्रिटनची राजेशाही टिकली ती ब्रिटिशांचा त्यांच्या परंपरांविषयी असलेला कमालीचा अभिमान आणि बदलाचे वारे समजून घेत हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर येण्याची तयारी, कधी नाईलाजाने तर कधी आनंदाने दाखवलेल्या राणीमुळे, म्हणजे अर्थात क्वीन एलिझाबेथ २ यांच्यामुळे”, असं राज ठाकरे या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

राणी एलिझाबेथ II यांचे निधन झाले आहे, बकिंगहॅम पॅलेसने घोषणा केली

लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version