राज ठाकरेंच्या ‘या’ सूचक विधानानंतर, युतीची चिन्ह ?

राज ठाकरेंच्या ‘या’ सूचक विधानानंतर, युतीची चिन्ह ?

महाराष्ट्रातील सत्तांनंतर शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाले. कालांतराने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली. अशातच भाजप व मनसेची जवळीक वाढू लागली. राज ठाकरे व देवेंद्र फडणवीस हे भेटीमागील कारण राजकीय नाही असे म्हणत वरचेवर भेटू लागेल. यानंतर शिंदे गट किंवा भाजपसोबत आगामी निवडणुकीमध्ये युती होण्याची चर्चा रंगली आहे. तर खुद्द मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘डबे जोडण्याच काम सुरू आहे’ असं सूचक विधान केलं आहे. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मनसे नेते आणि सरचिटणीस यांच्यासोबत ठाकरे यांची बैठक पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा : 

ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करणे अन्यायकारक, ओबीसी एकीकरण समितीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

आजची पक्षाची अंतर्गत बैठक आहे. त्यामुळे आज कुणी काही बोलणार नाही. आज अंतर्गत बैठक आहे, इतका मसाला काही आज मिळणार नाही पण डबे जोडण्याचं काम सुरू आहे, असं सूचक विधान राज ठाकरेंनी केलं. तसंच, मी विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहे. मी पहिल्यांदा नागपूरला जात नाहीये. यापूर्वी जेव्हा गेलो तेव्हा रेल्वेनेचं जातो. लांबचा प्रवास आहे त्यामुळे रेल्वे बरी पडते, त्यामुळेजेट लेग होत नाही, असा खुमासदार टोलाही राज ठाकरेंनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात अजित पवारांनी धरलेल्या मौनाचे कारण आले समोर…

असा असेल राज यांचा विदर्भ दौरा

२० तारखेला ते चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. २१ ला राज ठाकरे अमरावती जिल्ह्याच्या दौ-यासाठी निघतील. तेथे दोन दिवस पश्चिम विदर्भातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करतील २३ ला तेथून मुंबईकडे रवाना होतील. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारा राज ठाकरे यांचा दौरा मनसेत प्राण फुंकणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात अजित पवारांनी धरलेल्या मौनाचे कारण आले समोर…

Exit mobile version