राज ठाकरे वरळीच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावर ही भेट घेतली आहे. वरळी परिसरातील बीडीडी चाळ, सिडकोच्या विविध प्रश्नांसाठी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. वरळी मतदार संघाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात अस्तित्वात असणारे विविध प्रश्न घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आले होते.

राज ठाकरे वरळीच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावर ही भेट घेतली आहे. वरळी परिसरातील बीडीडी चाळ, सिडकोच्या विविध प्रश्नांसाठी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. वरळी मतदार संघाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात अस्तित्वात असणारे विविध प्रश्न घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आले होते. आदित्य ठाकरेंच्या मतदार संघातील प्रश्न राज ठाकरे घेऊन आल्याने वेगवेगळ्या राजकीय चर्चाना आता सुरुवात झाली आहे. सध्या वरळी मतदारसंघात बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पचे कामं सुरु आहे. यामुळे काही दिवसांपूर्वीचं वरळीतील मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती व त्यांना उदभवणाऱ्या समस्यांची मांडणी त्यांनी राज ठाकरे यांच्यासमोर ठेवली होती. तर काल आदित्य ठाकरेंनी पोलिसांच्या बीडीडी चाळीतील घरांबाबत पोलिस आयुक्तांची भेट घेतली होती.

सोबतच राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. त्यामुळे अवकाळी पावसाची झळ ज्या शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झाल आहे . त्यामुळे अवकाळी पावसाची झळ ज्या शेतकऱ्यांना सोसावी लागत त्यांना तात्काळ राज्य सरकारने मदत पुरवावी अशी मागणी या बैठकीत राज ठाकरे यांनी केली आहे.

या भेटीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेवर भाष्य केला आहे. खारघर घटने सरकारवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर राज ठाकरेंनी यावर उत्तर दिलं आहे. कोरोना काळातही सरकारकडून अनेक हलगर्जीपणाच्या घटना घडल्या आहेत. या घटनेच उगाच राजकारण करायची गरज नाही. तो कार्यक्रम सकाळी नव्हता करायला पाहिजे, धर्माधिकारी यांचा सत्कार राजभावनात झाला असता तर बरं झालं असतं. तो सगळा अपघात आहे, त्याचे राजकारण करायची गरज नाही अस मत राज ठाकरे यांनी परखडपणे मांडले आहे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह विविध शिष्टमंडळांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी आमदार राजू पाटील, अमित ठाकरे, माजी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे नेते सह्याद्री अतिथीगृह येथे उपस्थित होते.

हे ही वाचा : 

छ. संभाजी महाराजांचे अधिकृत छायाचित्र लवकरच महाराष्ट्रासमोर येणारं

Rahul Gandhi यांना सुरत कोर्टाने दिला मोठा धक्का, काँग्रेसची हायकोर्टात धाव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version