विधानसभा अध्यक्ष पदी भाजप चे नार्वेकर, माविआ कडून साळवींना उमेदवारी

अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून आमदार राहूल नार्वेकर तर माविआ कडून आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

विधानसभा अध्यक्ष पदी भाजप चे नार्वेकर, माविआ कडून साळवींना उमेदवारी
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान होताच राज्यात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मात्र नव्या सरकारची बहुमत चाचणी होण्याआधीच शिंदे सरकारने विधानसभा अध्यपदाची निवडणूक लावली आहे. त्यामूळे राज्यात विधानसभा अध्यक्ष पदी कुणाची वर्णी लागणार या बद्दल चर्चा सुरू असताना अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून आमदार राहूल नार्वेकर तर माविआ कडून आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नवे सरकार स्थापन होण्याआधी माविआ सरकार राज्यात कार्यरत असताना नाना पटोले यांच्याकडे हे पद होते. पण आता नाना पटोले यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद मिळताच अध्यक्ष पदाची जागा आता रिक्त आहे.
Exit mobile version