spot_img
Monday, September 16, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

माझं डोकं फिरवू नका, तुमच्यात एवढी खुमखूमी असेल तर… राऊतांची Manoj Jarange Patil यांच्यावर जहरी टीका

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर जोरदार आगपाखड केली आहे. माझ्या आतड्याला इन्फेक्शन झाल्यामुळे मी आपणाला ४ ते ५ दिवस लेट भेटायला आलो, तेव्हा आपली भाषा बोलण्याची योग्य होती का आणि हा सुसंस्कृतपणा झाला का ? हेच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपणाला शिकवलं आहे का ? असा रोखठोक सवाल राऊतांनी जरांगे पाटलांना विचारला आहे. त्यामुळे आता मनोज जरंगे पाटील आणि राजेंद्र राऊत त्यांच्यातील वाद आता वाढण्याची शक्यता आहे.

राजेंद्र राऊत यांनी आज (शनिवार, ७ सप्टेंबर) पत्रकारांशी सांवाद साधत मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “नेमकं कोणाला शिव्या देत आहात तुम्ही,काय चाललं आहे? नीट विषय तरी समजून घ्या. ज्या मराठा समाजाने तुमचा मान-सन्मान केला, आदर केला,मराठ्यांचे आमदार,आजी-माजी मंत्री उगाच कोणाच्या वाट्याला जायचे म्हणून बिचारे गप्प बसतायत, तुमच्या शिव्या खातात. माझ्या आतड्याला इन्फेक्शन झाल्यामुळे मी आपणाला 4 ते 5 दिवस लेट भेटायला आलो, तेव्हा आपली भाषा बोलण्याची योग्य होती का आणि हा सुसंस्कृतपणा झाला का? हेच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपणाला शिकवलं आहे का ? या प्रश्नाचे उत्तर द्या,” असे ते म्हणाले.

ते आक्रमक होत पुढे म्हणाले,”आरक्षणाची गरज माझी बायको आणि आईबापाला ही माहिती आहे मात्र माझी बायको आणि आईबापाने तुम्हाला काही बोलले आहेत का ? बार्शी तालुक्यातील मराठ्यांची पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत असतील तर तुमच्या नाकाला झोंबलं असेल आणि माझ्या कुटुंबापर्यंत तुम्ही जात असाल. दादा मी ही छत्रपती शिवरायांचा मावळा आहे, माझ्या घराण्याने ही छत्रपतींच्या गादीसाठी रक्त सांडल आहे. या तालुक्यात मराठा समाजासाठी मी पण रक्त सांडल आहे आणि जेलमध्ये गेलो आहे ते पण बघा. आपणाला एवढी खुमखूमी जर असेल तर राजा राऊताच्या दारात सभा घेण्याची तर तुम्ही मराठा समाजासाठी प्रामाणिकपणे कोणाला मॅनेज होत नाही एका टार्गेट करून… फडणवीस नव्हे तर महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आहेत. महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचे सरकार आणायचे हे पाप जर तुमच्या मनामध्ये असेल तर लोकसभेला तुम्ही महाविकास आघाडीला झुकत माप दिले आहे, त्यांच्याकडून लिहून घ्या. मी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित दादा कसे लिहून देत नाहीत ते मी बघतो, ती माझी जबाबदारी आहे. जर या तिन्ही नेत्यांनी लिहून नाही दिलं तर आमदार राजेंद्र राऊतचा राजकीय सन्यास जाहीर करतो. जर या तिन्ही नेत्यांकडून लिहून नाही आणलं तर राऊत घराणं राजकारण सोडून मराठा बांधवांसाठी छत्रपती शिवराय प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करू,भले ही 10 – 20 एकर जामीन आणि इस्टेट गेली तरी चालेल,” से ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “तुम्ही प्रामाणिक भूमिका घ्या, माझ्या घरी चहापानाला या, भोसले चौकातून घरापर्यंत फुल आतरतो आणि पेढ्यांचा घास भरवतो. तुम्ही फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लिहून आणा. तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा, मात्र जर या मराठ्यांच्या छाव्याला आणि छत्रपतीच्या मावळ्याला डिवचण्याचा प्रयत्न केला.खंडोजी खोपडेच्या भूमिकेत जाल तर राजा राऊत म्हणतात मला, काय परिणाम होईल, अख्खा महाराष्ट्रात इतिहासात नोंद करेल, माझं डोकं फिरवू नका तुम्ही… मी ज्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी करेन त्या दिवशी पांडे चौकात फाशी घेईन. जरांगे फक्त प्रामाणिक मराठा म्हणून माझ्या दारात या, पेढा भरावेन,मात्र खंडोजी खोपडेचा रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा भोगावी लागेल, हे राजा राऊतचं चॅलेंज आहे. कोण मराठ्यांचा माणूस बोलत नव्हता मात्र हा पठ्ठ्या राजा राऊत. किती तुकडे व्हायाचेत आणि किती तुकडे करायला लावायचे आहेत याच भान मला पण राहणार नाही. सभा उधळणे माझं काम नाही, इमानदारीने बार्शीत या 50 लाख रुपये खर्चून पांडे चौकात तुमची घेण्याची जबाबदारी माझी आहे. बार्शीतल्या प्रत्येक घरातील मराठ्यांच्या बायामाणसासहित सभेला आणण्याची जबाबदारी माझी असेल. सभेची तारीख सांगा, सभेत खडा सुद्धा पडणार नाही, संरक्षण देण्याची ही या छत्रपतीच्या छाव्याची जबाबदारी. इथून पुढे तुम्ही उत्तर द्याचं,मग माझी १०-२० हजारांची सभा,तुम्ही आहेत आणि मी आहे,” असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

Ganeshotsav 2024: एक वाटी गव्हाचे पीठ आणि झटपट मोदक तयार…

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा!…

Ganeshotsav 2024: यंदाच्या गणपतीत बाप्पासाठी बनवा मूगडाळीचे पौष्टिक मोदक

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss