spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राजकणार भूकंप?, अजित पवार भाजपाबरोबर जाणार? अंजली दमानियांचे ‘ते’ ट्वीट होतंय जोरदार व्हायरल

सध्या राज्यात नवनवीन राजकीय भूकंप हे होतच आहेत. अश्यातच पुन्हा एकदा एक नवा भूकंप येणार अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आता लवकरच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार आहेत अश्या चर्चा आज रंगू लागल्या आहेत. अजित पवार हे भाजपमध्ये जाणार आहेत असा दावा सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने केला नाही. या संदर्भात एक ट्विट देखील व्हायरल होत आहे.

 अजित पवार हे भारतीय जनता पार्टीसोबत जाणार अश्या चर्चा सध्या जोरदार रंगत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याचं ट्वीट केलं आहे. या ट्वीटनंतर चर्चांना उधाण आलं आहे. अंजली दमानियांनी हा दावा करताना मंत्रालयातील एका घटनेचा संदर्भ दिला आहे.अंजली दमानिया म्हणाल्या, “आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, १५ आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपाबरोबर जाणार आहेत. तेही लवकरच. महाराष्ट्राच्या राजकारणाची आणखी किती दुर्दशा होतेय ते बघू.” आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची…

 तसेच पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चा वारंवार होतात. अशातच या ट्वीटने या चर्चांना आणखी वेग आला आहे. त्यामुळे आता यावर अजित पवार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा : 

उन्हाळ्यात फ्रीजमधलं नाही तर माठातलं पाणी प्या

उष्णतेवर मात करण्यासाठी ‘या’ टिप्सचा वापर तुमच्या मेकअपमध्ये नक्की करा

Baisakhi निम्मित घरच्या घरी बनवा Punjabi Kadhi

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss