spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

छ. शिवाजी महाराज माझं दैवत! त्यांच्या चरणावर शंभर वेळा डोकं ठेवून माफी मागायला तयार: CM Eknath Shinde

Rajkot Fort: राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या प्रकरणी आता महाविकास आघाडीचे नेते मैदानात उतरले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याचा निषेधार्थ आज (गुरुवार, २९ ऑगस्ट) राज्यभरात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) तसेच शिवप्रेमींकडून निदर्शने करण्यात आली. महायुतीचे (Mahayuti) घटकपक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (NCP) गटानेही राज्यभर मूक निदर्शने केली. कालच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी याबाबत जनतेची माफी मागितली होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीही याबाबत माफी मागितली असून, “छत्रपती शिवाजी महाराज माझं दैवत असून त्यांच्या चरणावर शंभर वेळा डोकं ठेवून माफी मागायला मी तयार आहे,” असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत याबाबत भाष्य केले. ते म्हणाले, “मालवण मधील शिवाजी महाराजांचा पुतळ्यासंदर्भात चर्चा झाली. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे मनाला दु:ख देणारी आहे. शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे. काल या संदर्भात बैठक झाली. दोन कमिट्या नेमल्या आहे. एक कमिटी दुर्घटना कशी झाली या कार्यवाहीसाठी आणि दुसऱ्या कमिटी शिल्पकार असतील ज्यांना पुतळा बनवण्याचा अनुभव असेल, नेव्ही , इंजिनियर यांची असेल. लवकरात लवकर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायला पाहिजे. ही भावना जनतेची आहे. झालेली घटना दुर्दैवी पण त्यावर राजकारण करणं ते त्यापेक्षा दुर्दैवी आहे. विरोधकांना अनेक विषय आहेत राजकारण करायला , शिवाजी महाराज आपलं दैवत आहे. विरोधक जर माफीची मागणी करत असतील तर छत्रपती शिवाजी महाराज माझं दैवत त्यांच्या चरणावर शंभर वेळा डोकं ठेवून माफी मागायला मी तयार आहे. विरोधकांना सुद्धा महाराजांनी सुबुद्धी द्यावी,” असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

नवीन भव्य पुतळ्यासाठी तांत्रिक समिती, मुख्यमंत्र्यांचे आदेश

सिंधुदुर्ग जिल्यातील मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटने संदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ही समिती जबाबदारी निश्चित करेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तुत्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समितीही नेमण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. छत्रपतींच्या पुतळ्याला नव्याने भव्य स्वरुपात तयार करणे आणि उभारणे यासाठी जे.जे. स्कूल ऑफ आर्टस, आयआयटी, स्थापत्य अभियंते, महाराष्ट्रातील नामांकित शिल्पकार, तसेच नौदलाचे तांत्रिक अधिकारी यांची एक समिती देखील नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

हे ही वाचा:

Rajkot Fort: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्यासंबंधित चौकशीसाठी संयुक्त तांत्रिक समिती नियुक्त

Rajkot Fort Dispute: कोंबडी चोरांना आम्ही घाबरत नाही, Aaditya Thackeray यांचा राणेंना टोला

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss