Narayan Rane आणि त्यांचे चाराणे-बाराणे हे कळसुत्री बाहुल्या, मुख्य सूत्रधार Devendra Fadnavis: Sushma Andhare

Narayan Rane आणि त्यांचे चाराणे-बाराणे हे कळसुत्री बाहुल्या, मुख्य सूत्रधार Devendra Fadnavis: Sushma Andhare

राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या प्रकरणी आता महाविकास आघाडीचे नेते मैदानात उतरले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे पाहणीसाठी गेले असता त्यावेळी नारायण राणे समर्थक आणि शिवसेना उबाठा गटाच्या (Shivsena UBT)  कार्यकर्त्यांमध्ये प्रवेशद्वारावरच मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. आता शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी यावरून प्रतिक्रिया देत नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘नारायण राणे आणि त्यांचे चाराणे बाराणे हे कळसुत्री बाहुल्या असून मुख्य सूत्रधार हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत,’ असा घणाघाती आरोपदेखील त्यांनी यावेळी केला.

पुणे येथे पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारे म्हणाल्या, “ज्या राज्यात मंत्री ठोकून काढायची वार्ता करतात. गृहमंत्र्यांच्या जीवावर कायदा व सुव्यवस्था हातात देतात. नारायण राणे गुंडगिरीची भाषा करतात. पत्रकारांना धमक्या देतात. सामाजिक शांतता भंग करण्याचा गुन्हा नारायण राणेंवर दाखल झाला पाहिजे. नारायण राणेंना अटक झाली पाहिजे. काल त्यांनी जी भाषा वापरली, ती त्यांच्या संस्काराचा भाग आहे. पोलिसांना दमदाटी करणे हे सगळे गृहमंत्र्यांमुळे सुरू आहे. नारायण राणे आणि त्यांचे चाराणे-बाराणे हे कळसुत्री बाहुल्या आहेत. मुख्य सूत्रधार हे देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीसांनी नारायण राणेला मोकळं सोडलं आहे का?” असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.

आदित्य ठाकरे आणि शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांच्या राजकोट किल्ल्याला दिलेल्या भेटीवरून नारायण राणे आणि समर्थकांनी जोरदार राडा केला. यावरून सुषमा अंधारे आक्रमक होत म्हणाल्या, “छ. शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड-किल्ल्यांचा सातबारा हा नारायण राणेंच्या बापाचा नाही. हा महाराष्ट्राच्या बापाचा सातबारा आहे. सरकारला आंदोलनं हाताळता येत नाही,” अशी टीका त्यांनी केल्या.

हे ही वाचा:

महायुती आणि मविआला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रात तिसरी आघाडी स्थापन होणार, बच्चू कडूंनी केला मोठा दावा

मालवण मध्ये जे झाले ते महाराष्ट्राच्या गृहखात्यावर थुंकण्याचा प्रयत्न; Devendra Fadnavis गृहमंत्री म्हणून लाज वाटली पाहिजे: Sanjay Raut

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version