Wednesday, September 25, 2024

Latest Posts

शिंदे गटातील पदाधिकाऱ्याचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश…

या परिस्थितीत पक्षासोबत राहणे गरजेचे आहे. शिवसेना या चार शब्दांनी मला ओळख दिली आहे. त्यामुळे पक्षाचे नाव जपणे महत्त्वाचा आहे असं मला वाटतं.

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंड करत शिवसेना पक्ष सोडला होता. त्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांनी भाजपाशी हातमिळवणी करत मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वतःकडे घेतली. एकनाथ शिंदेंमुळे उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणारा एक गट आणि एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणारा दुसरा गट असे दोन गट शिवसेनेत पडले. एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणाऱ्या गटात पदाधिकारी राजू विटकर यांचाही समावेश होता.पण, शिंदे गटातून पुन्हा शिवसेनेत सामील होणारे राजू विटकर हे पहिले शिवसैनिक ठरले आहेत. पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना पत्र लिहून त्यांची माफी मागत पुन्हा पक्षात जोमाने काम करू, असे वचन विटकर यांनी या पत्राद्वारे दिलं आहे.

राजू विटकर म्हणाले की, मी गेली तीस वर्ष शिवसेनेत काम करत होतो. मला दोन-तीन वेळा तिकीट दिले होते. रोजच्या बातम्या बघून पक्ष प्रवेश चालले होते, तेव्हा मला एकनाथ शिंदे यांना भेटावं आणि काही गोष्टी बोलाव्यात असं वाटलं म्हणून मग मी मुंबईला गेलो, मेळाव्यात सहभागी झालो. मुख्यमंत्री शिंदे यांनी माझं नाव घेतलं मला आनंद झाला, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर मुंबईहून मी पुण्यासाठी निघालो मध्यरात्री दीड पावणे दोन वाजता घरी आलो. घरच्यांनी विचारलं तेव्हा मी सगळं सांगितलं परंतु माझ्या घरच्यांना ते पटलं नाही. पक्षसोबत मी हे असं करायला नको होतं असं माझं कुटुंबीयांचं म्हणणं होतं. त्यानंतर मी टीव्ही लावली तर त्यावर आदित्य ठाकरेंची रॅली पहिली, काही वयस्कर शिवसैनिक रडत होते. दिव्यांग होते, पत्र लिहिली होती हे सगळं पाहून मी भाऊ झालो. त्यातून माझे विचार बदलले आणि फार मोठी चूक करतो हे लक्षात आले, असं राजू विटकर यांनी सांगितला आहे.

या परिस्थितीत पक्षासोबत राहणे गरजेचे आहे. शिवसेना या चार शब्दांनी मला ओळख दिली आहे. त्यामुळे पक्षाचे नाव जपणे महत्त्वाचा आहे असं मला वाटतं, असं विटकर म्हणाले. त्यानंतर शिवसेना नेत्या नीलम गोरे यांची राजू मिटकर यांनी भेट घेतली. गोरे यांनी त्यांच्या वाहनातून भगवे उपरणं काढून राजू विटकर यांना पुन्हा पक्षात प्रवेश दिला. तसेच राजू विटकर यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून त्या पत्रात आपली चूक मान्य केली आहे आणि त्यांना पुन्हा पक्षात घेण्याची विनंती केली आहे.

मी दोनदा महानगरपालिकेच्या निवडणुकीत उभा राहिलो. मी इतका मोठा कार्यकर्ता नाही. देवाला साकडं घालतो काहीतरी चमत्कार घडावा एकच शिवसेना राहील. पक्षात फूट पडणार नाही. एकनाथ शिंदेंनी पुन्हा शिवसेनेसोबत एकत्र यावं, एकत्र काम करूया असं आवाहन शिवसैनिक राजू विटकर यांनी केलं आहे.

Latest Posts

Don't Miss