योगेश कदम यांच्या अपघातावर राम कदम त्यांची पहिली प्रतिक्रिया

योगेश कदम यांच्या अपघातावर राम कदम त्यांची पहिली प्रतिक्रिया

सध्या अनेक दिग्गज मंडळींचे अपघात होत असल्याचं दिसून येत आहे. भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत (Indian cricketer Rishabh Pant) त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महाराष्ट्र राज्य मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde), आमदार गोरे अन् आता शिंदे गटाचे आमदार योगेश कदम (Yogesh Kadam ) यांचे अपघात झाले आहे. योगेश कदम (Yogesh Kadam) हे माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे सुपुत्र आहेत. तसेच ते शिंदे गटाचे आमदारही आहेत. प्राथमिक माहितीनुसार हा अपघात रात्री १०. १५ सुमारास पोलादपूर (Poladpur) जवळील कशेडी घाटात चोळई येथे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला एका डंपरने धडक दिली आणि त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यासह चालक आणि तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर आमदार योगेश कदम हे सुदैवाने या बचावले आहेत. या अपघातावर योगेश कदम यांचे वडील आणि माजी आमदार रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रामदास कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना सांगितलं की, आमदार योगेश कदम यांच्या गाडीच्या पुढे व पाठीमागे पोलिसांचे वाहन असतानाही टँकरने पोलीस गाडीला ओव्हरटेक करून आमदारांच्या गाडीला पाठीमागून कसे ठोकरले, हीसर्व घटना संशयास्पद वाटते. या अपघाताची पूर्ण चौकशी होणे गरजेचे आहे, असे रामदास कदम (ramdas kadam) यांनी म्हटले आहे.

योगश कदम यांनी सुद्धा फेसबुक पेजवर व्हिडीओ पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. मी काल मुंबईला जात असताना माझा अपघात झाला. रात्री सव्वादहाच्या सुमारास हा अपघात झाला. परंतु, आई जगदंबेच्या कृपेने आणि जनतेच्या आशिर्वादाने मी व माझे सर्व सहकारी या अपघातातून सुखरुप बचावलो आहोत.” “अपघात झाल्यानंतर डंपर चालक हा फरार झाला असून. फरार चालकाचा शोध सध्या पोलिसांकडून घेतला जात आहे. पण या अपघाताचा पॅटर्न जरा वेगळा आहे. या अपघाताबाबत तपास करण्यासाठी मी पोलिसांना सांगितलं आहे.

हे ही वाचा:

आता आयपीएलचा लिलाव झाला असता तर ‘या’ खेळाडूला विकत घेण्यासाठी पैसे नसले असते, गौतम गंभीरने व्यक्त केले आश्चर्य

मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी केला आरोप, महालक्ष्मीची जमीन अंबानी, अदानीच्या घश्यात…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version