spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राम शिंदे साहेब, पुड्या सोडू नका तर पुरावा द्या; रोहित पवार

काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक वाद सुरु आहे. बारामती अॅग्रो साखर कारखान्याच्या गाळप हंगामावरून बाजपा नेते राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यामध्ये गेल्याच आठवड्यात जोरदार कलगीतुरा रंगला होता. राम शिंदेंनी कारवाईची मागणी केल्यानंतर रोहित पवारांनी हे लहान मुलांनी चॉकलेटसाठी रडण्यासारखं आहे, असं म्हणत खोचक टोला लगावला होता. आता पुन्हा एकदा रोहित पवार आणि राम कदम यांच्यामध्ये जुंपली आहे. यंदा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावरून या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका केली आहे. राम शिंदेंनी यांसदर्भात केलेल्या दाव्यावर रोहित पवारांनी खोचक शब्दांत प्रत्यु्त्तर दिलं आहे.

 आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी राम शिंदे यांचं एक विधान दिलं आहे. “माझ्या मतदारसंघात येऊ नका म्हणून आमदार रोहित पवार यांनी तानाजी सावंत यांना दहा फोन केले”, असं राम शिंदे म्हणाल्याचं रोहित पवार यांनी या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे. ज्याला पैसा आणि अहंकाराची खाज आहे, ज्याला हाफकीन संस्था आहे की व्यक्ती हेही माहिती नाही. जो महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करतो, अशा व्यक्तीला मतदारसंघात न येण्यासाठी मी कशाला मस्का लावू? असा सवाल विचारत रोहित पवार यांनी थेट राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका केली. तर पुढे, राम शिंदे साहेब पुड्या सोडू नका. ‘खेकड्या’ची चाल लोकं स्वीकारत नाहीत. हिंमत असेल तर याचा पुरावा द्या आणि यापुढं तुमच्याच प्रचाराला त्यांना जरूर बोलवा..मग मैदानात बघू! असं आव्हान रोहित पवारांनी राम शिंदे यांना दिलं आहे.

याआधीही तानाजी सावंत यांनी काहींना वाटतं, धनशक्तीच्या जोरावर पूर्ण महाराष्ट्र विकत घेऊ आणि अमेरिकेला जाऊ, असं थेट नाव न घेता नगरमध्ये जाऊन रोहित पवारांवर टीका केली होती. त्यामुळे आज रोहित पवारांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून तानाजी सावंतांसोबतच राम शिंदेंचाही चांगलाच समाचार घेतलेला दिसतोय.

हे ही वाचा :

राणांच्या आरोपांमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असून रवी राणा यांना आवर घालावा; गुलाबराव पाटील

IND vs SA: टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरणार, जाणून घ्या उद्याच्या सामन्यातील भारताचे वर्चस्व

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss