Ramdas Kadam : ‘ज्याला कावीळ असते त्याला जग पिवळं दिसतं’, ठाकरेंच्या दौऱ्यावरून रामदास कदमांचं टीकास्र

Ramdas Kadam : ‘ज्याला कावीळ असते त्याला जग पिवळं दिसतं’, ठाकरेंच्या दौऱ्यावरून रामदास कदमांचं टीकास्र

उद्धव ठाकरे यांना आणखीन एक झटका रामदास कदमांचा शिवसेनेला रामराम

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ओल्या दुष्काळाची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रति हेक्टर मदत द्यावी, अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारकडे यावेळी केली. या दौऱ्यावरून माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्र सोडलं आहे.

हेही वाचा : 

महायुतीवर आ.राजू पाटलांचे मोठं वक्तव्य म्हणाले, “आमची सर्वांची मनं जुळलेली, फक्त वरुन तारा जुळल्या…”

रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरेंना किती अभ्यास आहे माहिती नाही. अद्यापही पाऊस सुरू आहे. पंचनामे झाले नाही. पंचनामा होत नाही तोवर मदत जाहीर करता येत नाही त्याची कल्पना उद्धव ठाकरेंना नसावी. फक्त दिखावा करण्यासाठी दौरा केला. अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा आणि उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते व्हावे असं मला वाटतं हे कदमांनी सांगितले. तसेच अडीच वर्षात तुम्ही काय काम केले हे लोकांना सांगावे. अडीच वर्षात शिंदे-फडणवीस सरकारने ४०० निर्णय घेतले. जे चांगले आहे त्याचे कौतुक करण्याचं धाडस हवं. मुख्यमंत्रिपद गेल्याने त्याचे दुख आम्हाला समजू शकते. आनंदाचा शिधा काही ठिकाणी पोहचला नाही. पण अनेकठिकाणी १०० रुपये शिधा पोहचला. त्याला तुम्ही नाकारू कसं शकता? असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे.

ऑक्टोबर महिन्या अखेरीच सिनेप्रेमींसाठी बॉलीवूडची खास मेजवानी, पहा ‘ही’ चित्रपटांची यादी

“शिंदे-फडणवीस सरकारने घोषणांची खैरात पण मदत मात्र दिली नाही” या उद्धव ठाकरेंच्या विधानाबाबत विचारलं असता, रामदास कदम म्हणाले, “ज्यांना कावीळ असते, त्यांना सगळी दुनिया पिवळी दिसते, तशी अवस्था आता उद्धव ठाकरेंची झाली आहे. ते मागील अडीच वर्षात मातोश्रीतून कधीही बाहेर पडले नाहीत. केवळ दोन ते तीन वेळा ते मंत्रालयात गेले होते. अडीच वर्षात त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही आणि त्याची अंमलबजावणीही केली नाही.” असे कदमांनी म्हटले आहे.

IND vs PAK: ऋषभ पंतला पाहून चाहत्यांनी ‘उर्वशी-उर्वशी’ ओरडत गोंधळ घातला, पाहा हा व्हिडिओ

Exit mobile version