spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उलटे ढेकर देणारे हेच रामदास कदम; किशोरी पेंडणेकरांची खोचक टीका

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिवतिर्थावर कोणाचा दसरा मेळावा होणार यावरून मोठा वाद दोन्ही गटात दिसून आला. शिवसेनेला दसऱ्या मेळाव्याची परवानगी पलिकेनी नरकारल्यावर शिवसेनेकडून न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेनाला दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. आत येत्या ५ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा बी.के.सी ला तर शिवसेनेचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्क येथे होणार आहे. तसेच दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आणि टोलेबाजी सुरू आहे. दरम्यान, दसरा मेळाव्यावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दोन दसरा मेळावा होत असल्याने मला दुख होत आहे, असे वक्तव्य केले होते. त्याला आता शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रत्त्युतर दिले आहे.

“दसरा मेळाव्याबाबत त्यांना काय वाटतं हे कोणीही विचारलं आहे का? भर विधानसभेत ते बोलले होते, ‘माझ्या मुलाला उद्धव ठाकरेंनी तिकीट दिलं. मी इतेक वर्ष शिवसेनेत काम केलं. त्यामुळे मी समाधानी आहे.’ पण नंतर उलटे ढेकर देणारे हेच रामदास कदम होते. त्यामुळे त्यांनी जिथे जायचं तिथे जावं”, अशी बोचरी टीका किशोरी पेडणेकर यांनी रामदास कदमांवर केली होती.

माध्यमांशी बोलताना रामदास कदम यांनी दोन दसरा मेळावा होत असल्याचे दुख: आहे असे वक्तव्य केले होते. “यंदा दोन दसरा मेळावे होत आहेत. पण मी त्यावर समाधानी नाही. आम्ही रक्ताचं पाणी करून पक्ष उभा केला आहे. शेकडो केसेस आम्ही अंगावर घेतल्या. किती तरी यातना आम्ही भोगल्या. त्यामुळे दोन मेळावे बघून दुःख होत आहे”, असे ते म्हणाले होते.

हे ही वाचा:

Nobel Prize : स्वीडनचे शास्त्रज्ञ स्वांते पाबो यांना नोबेल पुरस्कार जाहीर

Dasara Melava : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला दिल्लीतून येतोय पैसा, राष्ट्रवादी नेत्याचा गंभीर आरोप

Follow Us

Latest Posts

Don't Miss