राजकोट किल्ल्यावर ठाकरे विरुद्ध राणे मध्ये जोरदार राडा ..

राजकोट किल्ल्यावर ठाकरे विरुद्ध राणे मध्ये जोरदार राडा ..

मालवणमधील शिवस्मारक हे सोमवारी कोसळे आणि जनप्रक्षोभ पाहायला मिळाला. त्यानंतर मूर्तिकार हा राहत्या घरातून पळून गेले आहे. अवघ्या ८  महिन्यांपूर्वी या पुतळ्याचे अनावरण हे मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी झालं होत. त्यांनत सरकारने हात वर करत सर्व खापर हे नौदलावर फोडण्यात आले. त्यानंतर अनेक वेगवेगळी वक्तव्य समोर आली. ज्यामुळे शिवप्रेमींना हा पुतळा किंवा स्मारक हे केवळ आणि केवळ राजकीय हेतुपुरत्वे केले आहे असे वाटते. शिवरायांचा हा पुतळा कोसळल्याने या पुतळ्याच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामावरून शिवप्रेमी हे  संतप्त झाले आहेत. शिवपुतळा परिसर सुशोभीकरणासाठी सुमारे ५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तरीही या पुतळ्याची दुरावस्था झाली या प्रकरणाने शिवप्रेमींमध्ये तांडव सुरु आहे. या प्रकरणी महाविकास आघाडीने निषेध आंदोलनाची सादही घातली आहे. अशातच आदित्य ठाकरे आणि नारायण राणे हे पाहणीला गेले आहेत. या दरम्यान दोन्ही गटांमध्ये राडा झाला.

ज्यावेळी हे दोन्हीही गट एकमेकांच्या समोर आले आणि नारायण राणे यांनी अर्वाच्च शब्दात भाष्य केले आहे. सोबतच आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यात त्यांनी सांगितले की- “पुढच्या १५ मिनिटात जर हे लोक इकडून गेले नाहीत तर आम्हीही जाणार नाही. आम्ही चोरवाटेने जाणार नाही इथेच थांबणार. BJP म्हणजे भ्रष्टाचारी असा पक्ष आहे. महाराष्ट्रात जर काही घडलं तर फडणवीस जबाबदारी घेतील.” त्याचप्रमाणे नारायण राणे यांनी पोलिसांच्या समोर धमकी दिलेली आहे. ते म्हणले की- “घरातून खेचून जीवानिशी मारून टाकू या लोकांना”. वातावरण हे अधिक चिघळत आहे. कारण इथे मारामारी तसेच अपशब्दांचा वापरही करण्यात आला. शिवसेनेच्या स्टाईलने काही व्हायचंय ते होऊन जाऊ दे, वैभव नाईक यांची आक्रमक भूमिका आहे. नारायण राणे हे परतताना दिसत आहे. त्याचप्रमाणे काही शिवप्रेमी यांनी सांगितले की- शिवजी महाराजांसारखा विषयाच तुम्ही राजकारण करू नये. हा महाराजचा अपमान आहे.  घडल्या प्रकरणी अतिरिक्त पोलीस- फौजफाटा मागवण्यात आला आहे. पोलिसांकरवी कर्यकर्त्यांची समजूत घालण्यात येत आहे. कार्यकर्त्यांच्या झेंडा दाखवण्यावरून सुद्धा बाचाबाची झाली आहे. झेंडा न सोडल्यामुळे शिवसेना उबाठा पक्षाची एक कार्यकर्ती जिच्या हातात झेंडा होता तिच्यावर पोलिसांची जबरदस्ती दिसून आली.

हे ही वाचा:

Sharad Pawar यांच्या पाठोपाठ आता मिळणार Mohan Bhagwat यांनाही Z+ सुरक्षा

Mahyuti चे राजकीय गणित बदलणार?; Fadnavis यांचे Shivaji Patil यांच्या नावाचे अप्रत्यक्ष संकेत

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version