राजद्रोहाच्या गुन्ह्याप्रकरणी राणा दाम्पत्य न्यायालयात हजर

राजद्रोहाच्या गुन्ह्याप्रकरणी राणा दाम्पत्य न्यायालयात हजर

हनुमान चालिसा आणि राजद्रोहाच्या गुन्ह्याप्रकरणी आज खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मुंबईतील बोरीवली न्यायालयात हजार झाले. या प्रकरणी आज आरोपपत्र दाखल करण्यात आलं. काही महिन्यात पूर्वी झालेल्या उद्धव ठाकरे आणि राणा दाम्पत्याचा वाद कोर्टात पोचला होता. हनुमान चालिसा आणि राजद्रोहाच्या गुन्ह्याप्रकरणी आज खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मुंबईतील बोरीवली न्यायालयात हजार झाले होते. या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यावेळी माध्यमाशी संवाद साधतांना रवी राणा म्हणाले आहेत की, ”आम्ही बेल बॉण्ड आज न्यायालयात सादर केले. आमच्यावर चुकीचे प्रकरण दाखल केल्याने आम्ही उच्च न्यायालयात जाणार. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. आम्हाला राजकीय सूडबुद्धीने त्रास दिला गेला. आम्हाला न्यायालयात जेव्हा बोलावणार आम्ही हजार राहू.”

यावेळी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या आहेत की, ”आम्ही न्यायालयात मतदारसंघांची सगळी कामे सोडून हजर आहोत. ज्या पद्धतीने आम्हाला फसवण्यात आलं. आम्ही घरी बसून हनुमान चालिसा वाचणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे आम्हाला तुरुंगात टाकण्यात आलं होतं. राजद्रोह सारखा गुन्हा दाखल करण्यात आला, जो सर्वात मोठा गुन्हा आहे. ३५३ कलम लावणं, आम्ही समाजात द्वेष निर्माण करण्याचं काम केलं, असा गुन्हा आमच्याविरोधात दाखल करण्यात आला. तसेच ३५३ अ चा अर्थ समाजात तेढ निर्माण करणे आहे. या स

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील निवासस्थान मातोश्रीबाहेर २३ एप्रिल रोजी हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचे कारण देत या जोडप्याने ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची त्यांची योजना रद्द केली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. आणि आज राणा दाम्पत्य बोरीवलीच्या न्यायालयात हजर होते.
र्व कलमांच्या अंतर्गत आमच्यावर जे गुन्हे दाखल केले. ज्यामुळे आम्हाला न्यायालयात बोलावलं, तर आम्ही हजर राहणार आहे.

हे ही वाचा:

भारताची पहिली मानवी अंतराळ उड्डाण मोहीम ‘गगनयान’ २०२४ मध्ये प्रक्षेपित होणार

सुकेश खंडणी प्रकरणी जॅक्लीन फर्नांडीसनंतर दिल्ली पोलिस करणार ‘या’ अभिनेत्रीची चौकशी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version