spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Rana VS Kadu: रवी राणा, बच्चू कडू वादात आता मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि आमदारांनी बंड केल्यानंतर पन्नास खोके एकदम ओके अशी टीका विरोधकांकडून वारंवार करण्यात आली. त्यानंतर आता गेल्या काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यामध्ये वाद सुरू झाला.

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि आमदारांनी बंड केल्यानंतर पन्नास खोके एकदम ओके अशी टीका विरोधकांकडून वारंवार करण्यात आली. त्यानंतर आता गेल्या काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यामध्ये वाद सुरू झाला. हा वाद आता विकोपाला गेला आहे. रवी राणा यांनी बच्चू कडूंवर ५० खोके घेतल्याचा आरोप केला आहे. बच्चू कडू यांनी राणांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना थेट राज्य सरकारलाच इशारा दिला. रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे सादर करावेत अन्यथा एक तारखेला वेगळा निर्णय घेऊ असं बच्चू कडू यांनी म्हटलंय.

दरम्यान, रवी राणा आणि बच्चू कडू यांचा वाद आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचला आहे. या वादात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मथ्यस्थी करणार आहेत. शिंदे यांच्या भेटीसाठी रवी राणा हे अमरावतीहून रवाना झाले आहेत. ते आज सकाळी ११ वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना देखील भेटायला बोलावलं आहे. त्यामुळे हा वाद मिटणार का हे पाहाणं महत्वाचं असेल.

दरम्यान, रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे सादर करावेत अन्यथा एक तारखेला वेगळा निर्णय घेऊ असं कडू यांनी म्हटलंय. तसेच आपल्याला सात ते आठ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावाही कडू यांनी केला आहे. त्यामुळे आता वरिष्ठ पातळीवर हा वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आता बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामध्ये मधस्थी करणार आहेत.

बच्चू कडू यवतमाळमध्ये बोलताना त्याचाच प्रत्यय आला. ‘धर्म कधीच धोक्यात येत नसतो, धोक्यात येतो तो नेता!’, कुणाचंही नाव न घेता असं बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू यांनी हा टोला नक्की कुणाला लगावला? याबाबत चर्चा झाली. बच्चु कडू यांनी हा टोला रवी राणा (Ravi Rana) यांना लगावल्याचं बोललं जातंय. मी १५ वर्ष मेहनत केली. दिव्यांगांसाठी काम केलं. १५० गुन्हे दाखल करून घेतले. सत्ता हा महत्वाचा विषय नाही. लोकांचे प्रश्न सुटायला हवेत. कार्यकर्ते हे सेवेच्या भावनेतून पेटून उठला पाहिजे. दोन शाखा कमी करा, पण मजबूत शाखा तयार करा, असं बच्चू कडू म्हणाले. फुकटची प्रसिद्ध म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा आहे. हनुमान चालीसा म्हणता येत नाही. तरी चालले तिकडं हनुमान चालीसा म्हणायला. अशावेळी हनुमानने गदा मारली मागून तर समजेल यांना, असं म्हणत त्यांनी रवी राणा यांना टोला लगावलाय. मशीद-मंदिरसाठी दंगल होते. शाळेसाठी दंगल झालेली मी कधी पाहिली नाही. सण उत्सवावर लाखो रुपये खर्च करता. त्यातले १ लाख वाचवा आणि समाजासाठी खर्च करा, असा सल्लाही बच्चू कडू यांनी राजकीय मंडळींना दिलाय.

हे ही वाचा :

आमदार कैलास पाटलांचे ७व्या दिवशी उपोषण मागे

जरी शिंदेंसोबत असलो तरी, मिलिंद नार्वेकरांबद्दल वाईट चितलं जाणार नाही – उदय सामंत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss