spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी राणेंचे अथक प्रयत्न, शिंदें-मोदींची भेट घडवणार?

सध्या महाराष्ट्रात वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पची चर्चा सुरु आहे. गुजरातकडे वळलेला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे मध्यस्थी करणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राणे लवकरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहित समोर येत आहे. यासंदर्भात चर्चा करण्यसाठी नारायण राणे यांनी आज सकाळी मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्ष निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा : 

आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी सैराट फेम ‘सुरज पवार’ला अटक होण्याची शक्यता

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून आज राज्यभरात युवसेना आणि राष्ट्रावादी कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोपाचा खेळ रंगला आहे. त्यामुळे या प्रकरणी तोडगा काढण्याचा प्रयत्न शिंदे सरकारकडून केला जाणार आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी महाराष्ट्रात अनुकूल वातावरण आहे, राज्यातूनच कंपनीला जास्त सवलत दिली जाईल, असे मुद्दे एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मांडण्याची चिन्हं आहेत.

नारायण राणे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात राज्यात उद्योग प्रकल्प आणण्याबाबत मोदींकडे मागणी करण्यासंदर्भात चर्चा झाली असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. यासाठी शिंदे, फडणवीस आणि नारायण राणे पंतप्रधान मोदींची लवकरच भेट घेणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

भारताची पहिली मानवी अंतराळ उड्डाण मोहीम ‘गगनयान’ २०२४ मध्ये प्रक्षेपित होणार

दुसरीकडे फॉक्सकॉन प्रकल्प नेमका कुणामुळे गुजरातला गेला याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मविआ सरकारवर निशाणा साधला आहे. “मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांताचे मालक अनिल अग्रवाल, फॉक्सकॉन आणि केपीएमजी यांच्यासोबत एक बैठक घेतली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. यावेळी सरकारकडून ज्या काही सवलती देणे शक्य आहे, त्या सर्व दिल्या जातील. तळेगावजवळील ११०० एकर जमीनही आम्ही देऊ केली होती. ३० ते ३५ हजार कोटींची सवलतीसह सब्सिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफर करण्यात आल्या होत्या, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. या प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षात जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता, ते कमी पडला असावा. मात्र, नवीन सरकारकडून शक्य तितक्या सर्व सवलती आम्ही देऊ केल्या होत्या.” असं शिंदे यांनी म्हटलं.

भारताची पहिली मानवी अंतराळ उड्डाण मोहीम ‘गगनयान’ २०२४ मध्ये प्रक्षेपित होणार

Latest Posts

Don't Miss