spot_img
Tuesday, September 10, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रणझुंजार अस्तित्वाची तुतारी फुंकणार….Sharad Pawar यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष, काय असणार महत्त्वाची घोषणा?

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आता महाराष्ट्रात सुरुवात केली आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने सामने असणार आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) असणार आहेत. या दोन्ही पक्षामध्ये जोरदार राजकीय संघर्ष राहणार आहे. त्यातच निवडणूक तयारीसाठी ८ ऑगस्ट रोजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून राज्यव्यापी जनसन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यासोबतच, शरद पवार यांच्या पक्षाकडून महत्त्वाची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत एक्स हॅन्डल वरून देण्यात आली आहे.

मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे आज ७ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे संबोधित करणार आहेत. ‘प्रसार माध्यमांनो… आम्ही सत्वाची, तत्त्वाची आणि रणझुंजार अस्तित्वाची तुतारी फुंकणार आहोत..अवघे अवघे या! असे आवाहन राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जन सन्मान यात्रा राष्ट्रवादी विचारधारेची! जन सन्मान यात्रा लोकशाहीच्या सन्मानाची! जन सन्मान यात्रा जनमाणसाच्या सद्भावनेची! जन सन्मान यात्रा, ‘शब्दा’ला जागण्याची! जन सन्मान यात्रा.. दृढ विश्वासाची! असे ट्विट करत येत्या ८ ऑगस्टपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभरात ‘जन सन्मान यात्रा’ प्रारंभ होत असल्याची माहिती दिली आहे. आमच्या आणि जनतेमधील नात्यात सद्भावनेचे बंध दृढ करणे, आमच्या कार्यतत्परतेला जनविश्वासाची जोड मिळावी हे या यात्रेमागील उद्दिष्ट आहे. पक्षाची जनकल्याणाची विचारधारा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचावी याकरिता ही यात्रा आहे. युवा वर्ग, महिला माता-भगिनी, आदिवासी व शेतकरी बांधव याप्रमाणे सर्व समाज घटकातील लोकांशी मी थेट संवाद साधणार आहे, जेणेकरून त्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेत त्यांचे तत्काळ निवारण करणे शक्य होईल. याशिवाय या यात्रेच्या माध्यमातून विरोधकांच्या निरर्थक आरोप खोटे असून विरोधकांचा खरा चेहरा जनतेच्या समोर आणणे हा यात्रेमागचा प्रामाणिक उद्देश असल्याचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा:

Muhammad Yunus यांच्याकडे Bangladesh च्या अंतरिम सरकारची जबाबदारी, भारताकडून येथील परिस्थितीवर डोळेझाक करणे कसे शक्य? Yunus यांचा सवाल

Raj Thackeray यांच्या ‘त्या’ व्यक्तव्यावरून मराठा आंदोलक आक्रमक; थेट समोरासमोर बसून केली चर्चा

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss