spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

CM Eknath Shinde यांना त्रास होऊ नये म्हणून माघार, मात्र जागेवर दावा कायम :Uday Samant; रत्नागिरी- सिंधुदुर्ग जागेवरून तिढा कायम

उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी माध्यमांशी बोलताना, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंत यांनी माघार घेतली," अशी प्रतिक्रिया दिली.

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabhaa Election 2024) रणधुमाळीला सुरुवात झाली असली तरीही अद्याप राज्यातील मित्रपक्षांमध्ये जागावाटपावरून तिढा कायम आहे. खासकरून महायुतीमधून रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील (Ratnagiri-Sindhudurg Loksabha Election) जागा कुणाकडे जाते, ह्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. भारतीय जनता पक्ष (BJP)आणि शिवसेना (Shivsena) हे दोन्ही पक्षांनी या जागेसाठी दावा ठोकला आहे. यातच, मंगळवारी, (२ एप्रिल) रत्नागिरी – सिंधुदुर्गमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी किरण सामंत (Kiran Samant) यांनी माघार घेतल्याची पोस्ट टाकली होती. यावरून उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी माध्यमांशी बोलताना, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंत यांनी माघार घेतली,” अशी प्रतिक्रिया दिली. किरण सामंत यांनी मंगळवारी रात्री फेसबुकवरून पोस्ट करत , “मा. नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा पंतप्रधान होण्याकरिता व अब कि बार ४०० पार होण्याकरिता रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांची माघार” अशी भावनिक पोस्ट केली होती. थोड्या वेळाने ती पोस्ट डिलीटही करण्यात आली. यावरून आज बुधवारी, (३ एप्रिल) नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना उदय सामंत म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंत यांनी माघार घेतली, मात्र त्या जागेवर आमचा दावा कायम आहे.” ते पुढे म्हणाले,”काल रात्रीचा निर्णय भावनिक होता. मात्र हि जागा आमच्याकडेच राहावी अशी सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे. मुख्यमंत्री शिंदेंना वाटाघाटी कराव्या लागतात याच वाईट वाटत.” “रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघावर शिवसेनेचा दावा आहे मात्र, अंतिम निर्णय मुख्यमंत्री शिंदे घेतील. किरण सामंत यांनी ते ट्विट मागे घेतलं आहे. काल रात्रीचा निर्णय भावनिक होता. आमच्याकडून शिवसेनेकडून एकाच उमेदवार आहे. मुख्यमंत्र्यांना त्रास होऊ नये म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून माघार घेतली. याबाबत उद्या रत्नागिरीला बैठक घेऊ. रत्नागिरीची जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे हि कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे, हि जागा शिवसेनेकडे असावी.” ते पुढे म्हणाले.

रत्नागिरी – सिंधुदुर्ग जागेवरून आज महायुतीची बैठक

रत्नागिरी – सिंधुदुर्गा मतदारसंघाच्या जागेवरून आज दुपारी ३ वाजता महायुतीची बैंठाक होणार आहे. या बैठकीला केंद्रीय मंत्री नारायण राणे, रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर, उदय सामंत, किरण सामंत, निलेश राणे आणि नितेश राणे हे उपस्थित राहण्याची शक्याता आहे. त्यामुळे या जागेचा तिढा आज सुटणार का ह्याकडे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

Pune Loksabha Election: Vasant More यांचा ‘वंचित’ मध्ये प्रवेश, पुण्यातून लढणार लोकसभा निवडणूक Ramesh Baraskar यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी, माढा मतदारसंघात तिरंगी लढत Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss