spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ratnagiri Uddhav Thackeray Sabha | उद्योग बाहेर पाठवायचे, दिल्लीला मुजरा करायला जायचं, फुटलेल्या एसटीच्या काचेवर जाहिराती लावायच्या; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर ‘गोळीबार’ | Live Updats

पक्षाचं नाव, चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली जाहीर सभा | Live Updats

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray Sabha) यांची रत्नागिरीच्या खेडमध्ये सभा पार पडत आहे. सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच ते खेड येथे आले आहेत. या सभेपूर्वी ठाकरे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं होत, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार (MLA) संजय कदम हे ठाकरे गटात प्रवेश करत आहेत. सभे अगोदर व्यासपीठावर लावण्यात आलेल्या बॅनरवर ठाकरेंनी शिवसैनिकांसाठी नवीन घोषणा देण्यात अली आहे. ‘आता जिंकेपर्यंत लढायचं’ अशी घोषणा देण्यात आली आहे.

सभेतील गर्दी पाहून उद्धव ठाकरे डोळ्यात मावत नाही असं हे आई जगदंबेचे रूप पाहायला मिळत आहे असं सुरुवातीलाच म्हणाले. माझ्याकडे काही नसताना आज तुम्ही गर्दी केलीत, गद्दार तोतया शिवसेना नाव चोरू शकता, पण शिवसेना नाही असं देखील ठाकरे म्हणाले. शिवसेना नाव बाजूला ठेवून तुमच्या आई वडिलांचं नाव लावून पक्ष बांधून दाखवा असा आवाहन उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला केलं आहे. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातील उद्योगांकडे बघायची कोणाची हिम्मत होत नव्हती, कर्नाटकची कधीही हिम्मत झाली नाही ते आज बोलू लागलेत अशी खंत देखील उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

 

मी घरात बसून महाराष्ट्र संभाळायला असं म्हणत विरोधकांच्या आरोपाला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिल आहे. तुमचा सगळा वेळ फिरण्यात, दिल्लीत मुजरा करण्यात जातोय असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. अख्ख महाराष्ट्र माझं कुटुंब म्हणून माझं कुटुंब माझी जबाबदारी, जो कुटुंब बदलत बसतो तो महाराष्ट्राची काय जबाबदारी घेणार? विधिमंडळातील सत्ताधाऱ्यांच्या आरोपांना उद्धव ठाकरे यांनी खेडच्या सभेत उत्तर दिल आहे. भाजपच्या व्यासपीठावर आधी साधू असायचे आता संधीसाधू असतात असा टोला ठाकरेंनी भाजपला लगावला आहे. विरोधी पक्षात असाल तर भ्रष्टाचारी, आज सर्वात जास्त भ्रष्टाचारी हे भाजप पक्षात आहे अशी टीका खेडच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी केली आहे. “फुटलेल्या काचांवर गतिमान महाराष्ट्र अशी जाहिरात लावल्या जातात, हसरे फोटो लावले जातात आणि लिहिल जातं गतिमान महाराष्ट्र” असं म्हणतं सत्ताधाऱ्यांच्या जाहिरातींवर उद्धव ठाकरेंनी सडकून टीका केली आहे.

शिवसेना पक्षाची स्थापना माझ्या वडिलांनी केली निवडणूक आयोगाच्या वडिलांनी नाही असं म्हणत निवडणूक आयोगाच्या निकालावर उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे. तुम्ही चोरांना आशीर्वाद देणार का? शिवसेना भाजपच्या आशीर्वाद यात्रेवर उद्धव ठाकरेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. कसब्यात भाजप साफ झालं आहे, चिंचवडमध्ये बंडखोरी झाली नसती तर तिथेही जिंकलो असतो. कसबा चिंचवडच्या निकालावर ठाकरेंनी भाष्य केलं आहे. शिवसेना प्रमुख म्हणून तुम्हाला मिंधे चालेल का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी सभेत जनतेला विचारला सोबतच निवडणूक आयोगाचा चोमडेपणा खपवून घेणार नाही, निवडणूक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही. असा इशाराही ठाकरेंनी दिला आहे. उद्या दिवस फिरले तर तुमच्या घराची काय हालत होईल याचा विचार करा असा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला लगावला आहे.

महाराष्ट्रात गुलामगिरी सहन करणार नाही, जे स्वातंत्र्यलढ्यात कुठेही नव्हते ते आज स्वातंत्र्यलढ्याबद्दल बोलत आहेत. देशाचे स्वातंत्र्य आज धोक्यात आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला आहे. अमित शहा पुण्याला येऊन गेले आणि त्यांच्या मुलाचा मला फोन आला, शिंदे अमित शहा हे माझ्या वडिलांसारखे आहेत असं म्हणाले म्हणून मला चिंता वाटत आहे असं बोलत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लावला आहे. बाळासाहेबांच्या नावाशिवाय महाराष्ट्रात मत मागून दाखवा तसेच मोदींच्या नावाने महाराष्ट्रात मत मागून दाखवा तुम्ही चोरांना मत देणार का? असं म्हणत उद्धव ठाकरेंनी खेडच्या जाहीर सभेत शिंदेच्या शिवसेनेला आव्हान दिले आहे.

 

Latest Posts

Don't Miss