शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून राऊतांची पदउतरणी ?

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाला (shinde group) शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळेच वळण आले. शिंदे गट हा ठाकरे गटावर आक्रमक होऊ लागला आहे. कोर्टात याबद्दल अजून निर्णय झाला नसला तरी शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने विधान परिषदेसाठी आपल्या गटातील आमदाराचे नाव प्रतोद म्हणून सुचवले आहे.

शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून राऊतांची पदउतरणी ?

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाला (shinde group) शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळेच वळण आले. शिंदे गट हा ठाकरे गटावर आक्रमक होऊ लागला आहे. कोर्टात याबद्दल अजून निर्णय झाला नसला तरी शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने विधान परिषदेसाठी आपल्या गटातील आमदाराचे नाव प्रतोद म्हणून सुचवले आहे. यानंतर,दुसरा मोठा निर्णय शिंदे गटाने दिला आहे. शिवसेनेच्या संसदीय गटाच्या नेतेपदावर असणारे तसेच उद्धव ठाकरे याच्याशी जवळचा संबंध असलेल्या खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना लवकरच पद सोडावे लागणार आहे. तसेच त्यांच्या जागी लोकसभा खासदार गजानन किर्तीकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.

शिवसेना-शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी यासंदर्भातील माहिती माध्यमांद्वारे दिली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गट चांगलाच आक्रमक झालेला दिसतोय . राज्यात सद्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे गटाला अडकवण्याचा प्रयत्न सुरु आहे. कारण निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिंदे गटाने विधीमंडळातील आणि संसदेतील शिवसेना पक्ष कार्यालय आपल्या ताब्यात घेतले आहे. उद्धव ठाकरेंना (uddhav thackeray) अडचणीत आणण्यासाठी शिंदे गटाने परिषदेत विप्लव बजोरिया यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली. विधानपरिषदेत उद्धव ठाकरे हे आमदार आहेत आणि सभागृहात प्रतोदचा व्हिप हा महत्वाचा असतो. त्यामुळे आता विप्लव बजोरियांचा व्हिपला उद्धव ठाकरेंना मान्य करावी लागणार का अशी चर्चा सुरू आहे.

शिवसेना शिंदे गटाकडून संसदीय पक्षाच्या नेतेपदी संजय राऊत यांची पदावरून उतरवणी केली जाणार आहे.राऊतयांच्या ऐवजी गजानन किर्तीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र संसदेच्या संबंधित समितीला दिले असल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली. लोकसभेत शिंदे गटाकडे १३ खासदार आहेत. तर, ५ खासदार ठाकरे यांच्या बाजूने आहेत तर, राज्यसभेतील तिन्ही खासदार ठाकरे गटाकडे आहेत.संसदीय नेता बदलल्यास ठाकरे गटाच्या खासदारांना शिंदे गटाचा व्हीप मानवा लागणार अन्यथा त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :

The CSR Journal चा प्रतिष्ठेचा ‘लीडरशीप फॉर सोशल चेंज अवॉर्ड’ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना बहाल..!

Maharashtra Assembly Budget Session, आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु, नव्या राज्यपालांनी केले अभिवादन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version