दंगली घडवायला काही राजकारणी कारणीभूत; Sharad Pawar यांच्या वक्तव्यावर Ravikant Tupkar यांची प्रतिक्रिया चर्चेत

दंगली घडवायला काही राजकारणी कारणीभूत; Sharad Pawar यांच्या वक्तव्यावर Ravikant Tupkar यांची प्रतिक्रिया चर्चेत

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कसून तयारी करत आहे. सत्ताधारी आणि विरोधक विविध प्रश्नांवरून एकमेकांवर सवाल उपस्थित करत आहेत. राज्यातील मराठा आरक्षणावरून निर्माण झालेल्या परिस्थितीवरूनही महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेते एकमेकांना कात्रीत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अश्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल (रविवार, २८ जुलै) आरक्षण प्रश्नावरून राज्यात दोन समाजात निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर भाष्य करत, महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होण्याची चिंता वाटते, असे वक्तव्य केले होते. त्यावर आता शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी भाष्य करत, ‘दंगली घडवायला काही राजकारणी लोकच कारणीभूत असतात,’ असे वक्तव्य केले आहे.

यावेळी माध्यमांशी संवाद साधत रविकांत तुपकर म्हणाले, “सध्या राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत बिघडलेली आहे. प्रत्येक नागरिक असुरक्षित आहे. राज्यांमध्येच एकंदरीत सामान्य माणूस भयभीत आणि असुरक्षित आहे. निवडणुका आल्या की जाती जातीत आणि धर्माधर्मात भांडण लावण्यासाठी अनेक नेते मंडळी पुढे येतात, त्याच्यातून दंगली घडवतात आणि त्या दंगली घडून मतांचा ध्रुवीकरण करायचं आणि मग कुठे हिंदू खतरे में है म्हणायचे कुठे मुस्लिम खत्रे में है म्हणायचं आणि आपापल्या मतांची पोळी भाजून घ्यायची असा उद्योग अजुन राजकारणात होतो. मला असं वाटतं दंगली घडवायला काही राजकारणी लोकच कारणीभूत असतात असं माझं स्पष्ट मत आहे.”

ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्राची मणिपुर सारखी परिस्थिती करायची नसेल महाराष्ट्र संस्कृत आहे आणि देशाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाकडे आदर्श पद्धतीने बघितलं जातं त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आपल्याला दिलेली आहे त्या पद्धतीने प्रत्येक राजकारणांनी राजकारण पुढे नेलं पाहिजे असं मला वाटतं. महाराष्ट्रात जर का मणिपुर सारखी परिस्थिती झाली तर अवघड होईल. शरद पवार यांनी जी भूमिका घेतली ती सगळ्यांनी बसलं पाहिजे तर मला असं वाटतं की भूमिका त्यांची बरोबर आहे. इतिहासात काय झालं मी ह्या खोलात जाणार नाही पण आजच्या परिस्थितीमध्ये शरद पवार साहेब असतील किंवा इतर राजकारणी असतील अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील त्या सगळ्यांनी सर्व पक्षांच्या लोकांना सोबत घेऊन मराठा आरक्षणाचा आणि ओबीसींचा प्रश्न त्याच्यामध्ये मध्यम मार्ग काढला पाहिजे,” असे ते म्हणाले.

काय म्हणाले होते शरद पवार?

नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलतां शरद पवार म्हणाले, “संसदेत मणिपूरमधील हिंसाचाराची चारचा झाली. मणिपूरमधील विविध जातीचे, भाषांचे लोक दिल्लीला आले होते. त्यांनीं आम्हाला माहिती दिली. मणिपूरमध्ये पिढ्यानपिढ्या एकत्र असलेल्या दोन जमातींमध्ये संघर्ष झाला. घरदार पेटवण्यात आली. स्त्रियांवर अत्याचार झाले. शेती उध्वस्त करण्यात आली. पिढ्यानपिढ्या एकत्र राहणारा सुसंवाद ठेवणारा समाज आज एकमेकांशी बोलायला तयार नाही. महाराष्ट्रातही मणिपूरसारखं काहीतरी घडण्याची चिंता वाटते. एवढं मोठं संकट राज्यावर आल्यानंतर त्यांना सामोरे जाण्याची राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण पंतप्रधान मोदी यांनी मणिपूरकडे ढुंकूनही पाहिलं नाही.”

ते पुढे म्हणाले, :”मणिपूरमध्ये जे घडलं ते आजूबाजूच्या राज्यात घडलं. कर्नाटकात तसाच घडलं. आता महाराष्ट्रातही काही घडते कि काय अशी चिंता वाटू लागली आहे. सुदैवाने महाराष्ट्राला दिशा देणारे अनेक युगपुरुष होऊन गेले. त्यांनी समाजाचा विचार केला,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

महिलांवरील वाढत्या अत्याचारविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक

साहेब… महाराष्ट्रातल्या बहिणींना आता लाडकी बहिण योजनेपेक्षा ‘सुरक्षित बहिण’ योजनेची गरज, MNS चा CM Shinde यांना टोला

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version