spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अरबी समुद्रात जलसमाधी घेणार, हिंमत असेल तर अडवून दाखवा; शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर

शेतकऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नाही. काहीही झालं तरी आज जलसमाधी आंदोलन होणारच असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिला आहे. आजच्या जलसमाधी आंदोलनासाठी एक हजार शेतकऱ्यांचा ताफा मुंबईच्या दिशेनं रवाना झाला आहे. हिंमत असेल तर अडवून दाखवा असा इशाराही रविकांत तुपकर यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांसह आज मुंबईकडे (Mumbai) रवाना झाले. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे ते म्हणाले की, सोयाबीनला साडेबारा हजार तर कापसाला साडेआठ हजारांचा दर मिळावा अशी आमची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. त्यानुसार ते आज शेतकऱ्यांना सोबत घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. उद्या शेतकऱ्यांचा आवाज समुद्र किनारी घुमणार आहे. तसेच दिवसा विज देण्याच्या मुद्दावरही तुपकर ठाम आहेत.

 हेही वाचा : 

Hill Station : हनीमूनला जाण्याचा प्लॅन करताय ? तर या ठिकाण्याचा नक्की विचार करा

राज्य सरकारने या आंदोलनाचा धसका घेत, तातडीने १५७ कोटींचा निधी मंजूर केला. पण हा निधी अपुरा असल्याचा दावा करत, तुपकर यांनी आंदोलनावर कायम असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे राज्य सरकारसमोरील पेच वाढला आहे.

रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस

६ नोव्हेंबरला तुपकरांच्या नेतृत्वाखाली बुलढाण्यात हजारो शेतकऱ्यांचा विराट मोर्चा निघाला होता. त्यावेळी तुपकरांनी मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन पेटवू, असा इशारा दिला होता. सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या प्रश्नावर सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे तुपकरांनी मुंबईच्या मंत्रालयाशेजारील अरबी समुद्रात हजारो शेतकऱ्यांसह जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला आहे. यामुळे प्रशासनाची आता चांगलीच तारांबळ उडालेली दिसत आहे. पोलिसांनी रविकांत तुपकरांना दिलेल्या नोटिशीमुळे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. रविकांत तुपकर मात्र आंदोलनावर (Swabhimani Shetkari Sanghatana) ठाम असल्यामुळे सरकार आणि तुपकरांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

कडाक्याच्या थंडीत करा पौष्टिक नाचणीचे लाडू…

Latest Posts

Don't Miss