भारतीय क्रिकेट संघातील ‘या’ खेळाडूची पत्नी गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या वतीने लढणार

भारतीय क्रिकेट संघातील ‘या’ खेळाडूची पत्नी गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या वतीने लढणार

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने गुरुवारी पहिली यादी जारी केली आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल घाटलोढियातून निवडणुकीच्या मैदानात उतरतील. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या जागी डॉक्टर दर्शिता शाह यांना तिकीट देण्यात आले आहे.भाजपने मोरबीचे विद्यमान आमदार बृजेश यांचे तिकीट कापले आहे. त्यांच्या जागी माजी आमदार कांतीलाल अमृतीया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मोरबी पुल दुर्घटनेवेळी कांतीलाल यांनी पीडितांना वाचवण्यासाठी स्वतः नदीत उडी मारली होती. त्यांनी बचाव मोहिमेचा एक व्हिडिओही पोस्ट केला होता. रविंद्र जडेजाची पत्नी रीवाबा यांना जामनगर उत्तरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बुधवारी उमेदवारी वाटपाच्या मुद्यावर बैठक झाली होती. जवळपास ३ तास चाललेल्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे पी नड्डा, राजनाथ सिंह यांचा समावेश आहे. या बैठकीत गुजरातच्या १८२ जागांवरील उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यात आली.

हेही वाचा :

Sanjay Raut : संजय राऊत यांचा राज ठाकरे यांच्यावर निशाणा! म्हणाले, ‘बोलण्याची प्रॅक्टीस…’

दुसरीकडे, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि भूपेंद्र सिंह चुडासामा आगामी विधानसभा विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत. त्यांनी गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांना पत्र लिहून निवडणूक न लढवण्याची विनंती केली आहे. या सर्वांनी आपला निर्णय पक्षनेतृत्वालाही कळवला आहे. दुसरीकडे, विजय रुपाणी सरकारमध्ये मंत्री राहिलेले सौरभ पटेल आणि प्रदीप सिंह जडेजा यांचीही निवडणूक लढण्याची शक्यता कमी आहे. आतापर्यंत एकूण आठ माजी मंत्र्यांनी निवडणूक न लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Sanjay Raut: तुरुंगातून बाहेर येताच राऊतांनी केलं फडणवीसांचं कौतुक, मोदी- शाहांची भेटही घेणार

रवींद्र जडेजाही निवडणुकीचा प्रचार करणार का?

रवींद्र जडेजाही पत्नीच्या निवडणूक प्रचारात हातभार लावू शकतो, असे मानले जात आहे. दुखापतीमुळे तो सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. ३३ वर्षीय अष्टपैलू खेळाडूने आशिया कपमध्ये भाग घेतला होता. तो ऑगस्ट-२०२२ पासून भारतीय संघाबाहेर आहे. टी-२० विश्वचषकासाठी त्याची निवड होणार होती, पण अखेरच्या क्षणी तो जखमी झाला.

India vs England 2nd Semifinal : दुसरा कोणता संघ फायनलमध्ये जाणार? आज भारत आणि इंग्लंडचा सामना कधी आणि कुठे पाहता येणार सामना?

Exit mobile version