शिंदे गटाचा शिवसेनेच्या कार्यालयावर ताबा घेतल्यावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया

शिंदे गटाचा शिवसेनेच्या कार्यालयावर ताबा घेतल्यावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया

मुंबई महापालिकेमध्ये (Mumbai Municipal Corporation) शिवसेनेचा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात जोरदार राडा पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या शिवसेना पक्ष कार्यालयावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने ताबा मिळवला. राहुल शेवाळे (Rahul Shewale), शितल म्हात्रे (Shital Mhatre), नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची भेट घेतली. या भेटीनंतर शिवसेना पक्षकार्यालयाबाहेर (Shiv Sena Party Office) यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या नावावर लावलेला कागद पटवत पक्ष कार्यालयावर ताबा मिळवण्यात आला. या सगळ्या गदारोळावर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी प्रतिक्रिया दिली.

“शिंद गटाचे काही खासदार आणि नगरसेवक जाणूनबुजून कुरापती काढण्याचे प्रकार करत आहेत. मुंबई महापालिकेतील कार्यालय आता शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्षाच्या (Uddhav Balasaheb Thackeray party) ताब्यात आहे. आमच्या माजी महापौर, नगरसेवक नियमीतपणे तिथे बसत असतात. पण खासदार राहुल शेवाळे यांनी बेशिस्तपणाची वागणूक करुन, ठाण्याचे नरेश मस्के यांना बोलवण्याचा प्रश्नच येत नाही”, अशी भूमिका ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मांडली. “त्यांनी कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलाय तो निषेधार्थ आहे. लोकं उभं करुन, कार्यालयात घुसून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचे पक्षाचे मुख्यमंत्री आहे. त्यांच्या गटाच्या माणसांनी अशाप्रकारे कायदा-व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करणे योग्य नाही”, असं विनायक राऊत म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांच्या माणसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं काम करणे हे निषेधार्ह आहे. सरकारने त्यांचा वेळीच बंदोबस्त करावा. महापालिकेत शिवसेनेचं कार्यालय अशा पद्धतीने कुरापत काढून घुसण्याचा प्रयत्न केला तर शिवसेनेचे नगरसेवक पूर्णपणे प्रतिकार करतील”, असा इशारा विनायक राऊत यांनी दिला.“कार्यालयाचा वाद हा विषय येऊच शकत नाही. तिथे अधिकृतपणे शिवसेनेचं कार्यालय आहे. पण या लोकांनी आगाऊपणा करण्याचा प्रयत्न केलाय. तो पोलिसांनी मोडून काढावा. नाहीतर आम्ही मोडून काढू”, असा देखील इशारा त्यांनी दिला.

हे ही वाचा:

शिंदे गटाचा शिवसेनेच्या कार्यालयावर ताबा, दोन्ही गट आमने-सामने

Anil Deshmukh: तुरुंगा बाहेर येताच अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version