प्रकाश आंबेडकरांशी चर्चेला तयार; अजित पवार

प्रकाश आंबेडकरांशी चर्चेला तयार; अजित पवार

ajit pawar

काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेकरांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर नंतर प्रकाश अंबेडकर महाविकास आघडी बरोबर जाणारा का?अशी चर्चा रंगू लागली. वंचितनं २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३५ लाखांहून अधिक मतं घेतली. परिणामी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० ते १२ जागांवर परिणाम झाला. पुढे महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग केला. हा प्रयोग अडीच वर्ष चालला. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह १३ खासदारांसोबत बंड केलं. राज्यात आता शिंदे गट आणि भाजपचं सरकार आहे. मुंबईत एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.

२० नोव्हेंबरला मुंबईतील शिवाजी मंदीरमध्ये उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर प्रबोधनकार.डॉट. कॉम या वेबसाईटच्या रिलाँचिंगच्या निमित्तानं एकत्र आले. या कार्यक्रमानंतर प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गट आणि आम्ही निवडणूक जाहीर झाली एकत्र येऊ असं म्हटलं. त्यामुळं शिवसेना ठाकरे गट आणि वंचितची युती झाल्यास मविआचं काय होणार असा सवाल विचारला जात होता. मात्र, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मतांची विभागणी टाळण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यावं, असं म्हटलं. आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चेला तयार असल्याचं देखील अजित पवार म्हणाले. आता त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी होणार का या संदर्भात चर्चा सुरु आहेत.

अजित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना वंचित बहूज आंबेडकर गट, गवई पक्ष, आठवले गट, कवाडे गट आहेत. गट म्हणण्यापेक्षा पक्ष आहेत. रामदास आठवले तिकडे जाऊन मंत्री होई पर्यंत आम्ही सोबत निवडणुका लढवल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आमच्या त्या त्यावेळच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केली होती. दिवंगत नेते आर. आर. पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली होती. त्याबद्दल त्यांनी तशी माहिती दिली होती. समविचारी पक्षांची मतविभागणी होऊ नये यासाठी आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतचर्चा करण्यासाठी तयार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा : 

वेळीच कारवाई झाली असती तर तिचा जीव वाचला असता ; श्रद्धाने लिहिलेलं पत्रावर फडणवीसांनी केलं भाष्य

Karthik Aaryan: कार्तिक आर्यनने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वेधले सगळ्यांचे लक्ष्य

विक्रम गोखले यांची तब्येत बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version