विरोधकांच्या सुरक्षेत कपात; तर सहा मंत्र्यांना वाय प्लस सुरक्षा

विरोधकांच्या सुरक्षेत कपात; तर सहा मंत्र्यांना वाय प्लस सुरक्षा

राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. सहा मंत्र्यांच्या सुरक्षेतमध्ये वाढ करण्यात आलीय. या मंत्र्यांना वाय प्लस विथ एस्कॉर्ट सुरक्षा देण्यात आली. महाविकास आघाडीमधील महत्त्वाच्या नेत्यांची सुरक्षा सरकारने नुकतीच काढून घेतली होती. सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेल्या मंत्र्यांमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, कामगार मंत्री सुरेश खाडे, बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, सहकार मंत्री अतुल सावे, महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा समावेश आहे. या सहा मंत्र्यांना वाय प्लस विथ एस्कॉर्ट सुरक्षा पुरविण्यत आलेली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने स्वतःच्या मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांना वाय प्लससह दर्जाच्या सुरक्षेसह एस्कॉर्ट कॅटेगिरीची सुविधा पुरवली आहे. त्यांच्या निर्णयावर आता विरोध काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात होती.

विशेष म्हणजे राज्य सरकारने शिवसेना शिंदे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ केली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा जैसे थे ठेवली होती. त्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. मविआ नेत्यांची सुरक्षा काढल्यानंतर आता राज्य सरकारकडून सहा मंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री सुरेश खाडे, बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, सहकार मंत्री अतुल सावे आणि महिला बालकल्याण मंत्री मंगल गावात लोढा यांना वाय प्लस विथ एस्कॉर्ट सुरक्षा पुरवण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत.

हे ही वाचा :

काँग्रेसला हाय कोर्टाचा मोठा दिलासा; काँग्रेसचं ट्विटर हँडल ब्लॉक करण्याच्या निर्णयाला स्थगिती

भर कार्यक्रमात नितीन गडकरींनी मागितली माफी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version