राज ठाकरेंच्या भेटीबाबत; सदा सरवणकर यांनी कारण स्पष्ट केले

शिंदे गटात सामील झालेले दादरचे आमदार सदा सरवणकर यांनी आज सकाळी 'शिवतीर्थ'वर राज ठाकरे यांची भेट घेतली.

राज ठाकरेंच्या भेटीबाबत; सदा सरवणकर यांनी कारण स्पष्ट केले

राज ठाकरेंच्या भेटीबाबत; सदा सरवणकर यांनी कारण स्पष्ट केले

नुकतीच एक शस्त्रक्रिया करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या घरी परतले. अनेकांनी त्यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. शिंदे – फडणवीस सरकार येण्याआधी मनसे शिंदे गटात सामील होणार अशी चर्चा होती. दरम्यान सदा सरवरणकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. (Shivsena leader meet MNS Raj Thackeray) या भेटीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

शिंदे गटात सामील झालेले दादरचे आमदार सदा सरवणकर यांनी आज सकाळी ‘शिवतीर्थ’वर राज ठाकरे यांची भेट घेतली. याबाबत सदा सरवणकर यांनी माध्यमांशी बोलताना भेटीचे कारण स्पष्ट केले आहे. यापुढे शिवसेनेला टक्कर देण्यासाठी आम्ही एकत्र येणार अशी चर्चा रंगली आहे. पण यात काही तथ्य नसल्याचे सदा सरवणकर यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केले. हिंदूत्वाची लढाई लढण्यासाठी अखंड हिंदू एकत्र येणं आणि त्यांच्यासाठी झगडणं हेच त्यामागचं उद्दिष्ठ आहे. आगामी निवडणुकाबाबत सरवणकर यांना विचारले असता, याबाबतीत मुख्यमंत्री निर्णय घेतील असे सरवणकर म्हणाले.

या भेटीमुळे सगळीकडे चर्चा रंगल्या. मात्र, सदा सरवणकर यांनी माध्यामांशी बोलताना सुरू असलेल्या चर्चाना पुर्णविराम दिला आहे. मनसे आणि भाजपाची वाढती जवळीक पाहता आगामी पालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Exit mobile version