मोठी बातमी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलासा, न्यायालयाकडून जामीन मंजूर

मोठी बातमी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलासा, न्यायालयाकडून जामीन मंजूर

ईडीनं मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अकरा महिन्यापूर्वी अटक करण्यात आले होते. आज अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालय सुनावणी होणार होती. तर, राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. देशमुखांचा जमीन मंजूर करण्यात आला आहे. अनिल देशमुखांचे कार्यकर्ते भावूक होऊन साहेबांची लवकरच निर्दोष सुटका होईल अशी भावना व्यक्त करत आहे.

अनिल देशमुख यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या नागपुरातील घरी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. अनिल देशमुख यांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्यमेव जयते असं म्हणत या निर्णयाचे स्वागत केलं आहे. आम्हच्या इतर नेत्यांसाठी लढत राहू असंही त्या म्हणाल्या.

अनिल देशमुख यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि अटकेत असलेले माजी पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी १०० कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला होता. परमबीर सिंह यांनी पत्रातून हे आरोप केले होते. या प्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाई केली. अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप करण्यात आला.

हेही वाचा : 

IND vs SA : केएल राहुल, विराटला अंतिम सामन्यासाठी दिली विश्रांती, तर आजच्या सामन्यात शाहबाजचे पदार्पण

Exit mobile version