मुलाच्या मृत्यूची आठवण करून देत महाजनांनी खडसेंवर केला जोरदार हल्लाबोल

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यातील वैर हे सर्वश्रूत आहेच. अशातच गिरीश महाजनांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसेंना डिवचलं आहे.

मुलाच्या मृत्यूची आठवण करून देत महाजनांनी खडसेंवर केला जोरदार हल्लाबोल

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यातील वैर हे सर्वश्रूत आहेच. अशातच गिरीश महाजनांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसेंना डिवचलं आहे. एकनाथ खडसेंना त्यांच्या मुलाच्या मृत्यूची आठवण करून देत महाजनांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. एकनाथ खडसेंच्या मुलाचा खून झाला होता की, आत्महत्या? असा प्रश्न महाजनांनी उपस्थित केला आहे.

एकनाथ खडसे यांचे चिरंजीव निखिल खडसे (Nikhil Khadse) यांनी आपल्याच पिस्तुलातून स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणात नेमकं काय झालं याचा अजूनही तपास पूर्ण झालेला नाही. त्याच मुद्यावर बोट ठेवून गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर हल्लाबोल केला आहे. गिरीश महाजन यांनी खडसेंच्या मुलाच्या मृत्यूसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. खडसेंच्या मुलाचा मृत्यू कसा झाला? त्यांनी आत्महत्या केली की, त्यांचा खून झाला? असे प्रश्न महाजन यांनी उपस्थित केले आहेत.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Rural Development Minister Girish Mahajan) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्यामधल्या शाब्दिक युद्धानं आता विखारी वळण घेतलं आहे. एकनाथ खडसेंच्या मुलानं आत्महत्या केली होती की, त्यांचा खून झाला, असा प्रश्न गिरीश महाजन यांनी विचारला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बोलताना गिरीश महाजनांना मुलगा नसल्याचा उल्लेख खडसेंनी जाहीररित्या केला होता. त्या पार्श्वभूमीवर महाजनांनी आता खडसेंच्या मुलाच्या मृत्यूविषयी प्रश्न उपस्थित केला आहे.

शनिवारी (१९ नोव्हेंबर) राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांना मुलगा नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर आज (२१ नोव्हेंबर) गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं. “मला दोन मुली असून, त्यांना राजकारणात आणलेलं नाही. त्याचा मला आनंद आहे. मात्र, खडसेंना प्रश्न आहे, त्यांनाही मुलगा होता. त्याचं काय झालं? त्यांच्या मुलाने हत्या झाली की आत्महत्या केली? हे तपासण्याची गरज आहे. मला जास्त बोलायला लावू नका, यातचं खडसेंचं भलं आहे,” असे गिरीश महाजन म्हणाले होते.

हे ही वाचा : 

आजोबा, वडील किंवा काकांपासून जे संस्कार मिळाले, त्यामुळे मी अत्यंत हार्डकोअर, कट्टर मराठी आहे; राज ठाकरे

वरून सरदेसाईंच्या मनधरणीमुळे युवासेनेच्या ३५ पदाधिकाऱ्यांनी घेतलं राजीनामा माघे

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version