सुप्रीम कोर्टामध्ये मागणी केल्याचे वृत्त निराधार, शिंदे गटाचे स्पष्टीकरण

आम्ही शिवसेना (Shiv Sena) भावनांवर दावा करणार नाही असं वारंवार शिंदे गटाने स्पष्ट केले आहे त्यामुळे शिवसेना भवन हे उद्धव ठाकरे यांच्याकडे असणार आहे हे स्पष्ट झाले असताना आज एका याचिकेमुळे सकाळी सगळीकडे खळबळ उडाली होती.

सुप्रीम कोर्टामध्ये मागणी केल्याचे वृत्त निराधार, शिंदे गटाचे स्पष्टीकरण

आम्ही शिवसेना (Shiv Sena) भावनांवर दावा करणार नाही असं वारंवार शिंदे गटाने स्पष्ट केले आहे त्यामुळे शिवसेना भवन हे उद्धव ठाकरे यांच्याकडे असणार आहे हे स्पष्ट झाले असताना आज एका याचिकेमुळे सकाळी सगळीकडे खळबळ उडाली होती. असे सांगण्यात येत होते की एका वकिलाने थेट सर्वाच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेमध्ये शिवसेना भवन, शिवसेनेच्या सर्व शाखा आणि शिवसेनेचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के (Naresh Maske) यांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे.

नरेश मस्के यांनी त्या पत्रामध्ये लिहिले आहे की, शिवसेना भवन, निधी आमच्या ताब्यात द्या अशी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केल्याची मागणी शिंदे गटाने केल्याचे वृत्त काही वृत्त वाहिन्यांनी दाखवले आहे हे वृत्त खोटे असून शिवसेना शिंदे गटाकडून अशी कोणतीही मागणी करण्यात आलेली नाही. असे त्यानी पत्रामध्ये लिहिले आहे. याचिका दाखल करणारे आशिष गिरी यांच्याशी शिवसेना पक्षाचा कोणताही संबंध नाही. सुप्रीम कोर्टामध्ये मागणी केल्याचे वृत्त निराधार आहे आणि शिवसेनेतर्फे या वृत्ताचा इन्कार करण्यात येत आहे असे शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी त्या पत्रामध्ये लिहिले आहे.

यासंदर्भात सकाळी माध्यमांशी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला होता ते म्हणाले होते की, इतक्या जमिनी लुबाडल्या त्या कमी पडल्या का? आता शिवसेना भवनावर दावा करत आहे असे ते म्हणाले होते. आधी ती याचिका त्यांची अधिकृत आहे का? हे तपासून बघायला पाहिजे आणि अनेक प्रश्नांची उत्तर त्यांनी नाही अशी दिली आहेत. त्यांनी पैसे सरकारी वापरला की स्वतःचा याच उत्तर देखील त्यांना देता आले नाही असे संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा : 

५६ वर्ष ज्या घराण्यामध्ये तुम्ही जन्माला आले ते घर टिकवू शकले नाही, नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

Exclusive : भाजपाला पोहोचायचं राज्यातल्या ३ कोटी कुटुंबात

Armaan Malik ने दिली खुशखबर, दुसरी पत्नी Kritika Malik बनली आई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version