Tuesday, July 2, 2024

Latest Posts

कोकण विभाग पदवीधर मतदार संघात बजावला मतदानाचा अधिकार..

ही मत मोजणी सोमवार १ जुलै २०२४ रोजी आगरी कोळी संस्कृती भवन, सेक्टर-२४, नेरुळ (पश्चिम), नवीमुंबई येथे होणार आहे. हाती आलेल्या माहिती नुसार साधरणतः मुंबई आणि कोकण या दोन्ही विभागात शिक्षक मतदार संघ तसेच पद्द्विधार मतदार संघ यांची एकूण आकडेवारी समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणूक पार पडली. त्यांनतर केंद्रामध्ये सत्तास्थापन झाली. त्यानंतर आता विधान परिषदेची रणधुमाळी सुरु झाली आहे. लोकसभेनंतर (Lok Sabha Election 2024) महाराष्ट्र (Maharashtra News) विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election 2024) चार जागांसाठी निवडणूक पार पडल्या आहेत. कोकण पदवीधर म्हणजे भाजपचा पारंपारिक मतदारसंघ. अशातच भाजपकडून मनसेची मनधरणी करण्यात आल्यानंतर मनसेच्या उमेदवारानं अर्ज मागे घेतला होता. सध्या तिथून निरंजन डावखरे आमदार होते. अशातच त्यांचा विधान परिषदेतील आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर भाजपकडून पुन्हा त्यांनाच उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी  २६ जून २०२४ रोजी कोकण विभागातील पाचही जिल्ह्यांच्या प्राप्त आकडेवारीनुसार एकूण ६४.१४ टक्के मतदान झाले.

  • कोकण विभागामध्ये १ लाख २७ हजार ७६९ पुरुष, ९५ हजार ६३९ स्त्री मतदार असे एकूण २ लाख २३ हजार ४०८ पदवीधर/शिक्षक मतदार आहेत.
  • त्यापैकी  ८४ हजार ६६५ पुरुष,५८ हजार ६३२ स्त्री असे एकूण १ लाख ४३ हजार २९७ पदवीधर/शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघात

  • मुंबई पदवीधर मतदारसंघात मतदार यादीनुसार ७१ हजार १० पुरुष तर ४९ हजार ७६१ स्त्री मतदार असे एकूण १ लाख 20 हजार ७७१ पदवीधर/शिक्षक मतदार आहेत.
  • त्यापैकी ८४ हजार ६६५ पुरुष तर २६ हजार ६०२ स्त्री असे एकूण ७६ हजार ६४६ पदवीधर/शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

मुंबई शिक्षक मतदारसंघात

  • मुंबई शिक्षक मतदारसंघात मतदार यादीनुसार ३ हजार ९५३ पुरुष तर ११ हजार ८८६ स्त्री मतदार असे एकूण १५ हजार ८३९ पदवीधर/शिक्षक मतदार आहेत.
  • त्यापैकी ३ हजार १३० पुरुष तर ८ हजार ८७२ स्त्री असे एकूण १२ हजार ०२ पदवीधर/शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

 कोकण विभाग पदवीधर मतदारसंघतील (Graduate Constituency)  मतदानाची एकूण टक्केवारी :

२६ जून २०२४ रोजी मतदान वेळ ही सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० पर्यंतची होती.

  • कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ  ६४.१४%
  • ठाणे- ५८.४२%,
  • पालघर- ६३.२३%,
  • रायगड- ६७.५९%,
  • रत्नागिरी- ६९.१४%,
  • सिंधुदूर्ग- ७९.८४%

मुंबई पदवीधर मतदारसंघाची एकूण टक्केवारी ही ५६.०१% इतकी होती. 

  • मुंबइ शहर- ५७.६८%
  • मुंबई उपनगर- ५५.४४%
  • एकूण- ५६.०१%

मुंबई शिक्षक मतदारसंघ ७५.७७%

  • मुंबइ शहर- ८०.१२%
  • मुंबई उपनगर-७४.९५%

ही मत मोजणी सोमवार १ जुलै २०२४ रोजी आगरी कोळी संस्कृती भवन, सेक्टर-२४, नेरुळ (पश्चिम), नवीमुंबई येथे होणार आहे. हाती आलेल्या माहिती नुसार साधरणतः मुंबई आणि कोकण या दोन्ही विभागात शिक्षक मतदार संघ तसेच पद्द्विधार मतदार संघ यांची एकूण आकडेवारी समोर आली आहे. या निवडणुकीसाठी महविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व महायुती (Mahayuti) यांच्यात चुरशीची लढत लागली आहे. आता कोण निवडून येईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. त्यामुळे विद्यार्थ्यंच्या व शिक्षकांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची अशी विधानपरिषद निवडणूक ठरणार आहे.

हे ही वाचा

 MAHARASHTRA ASSEMBLY MANSOON SESSION 2024 : “मतभेद असावेत परंतु मनभेद असू नयेत..” ; आजच्या अधिवेशनातील घटनांवर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया

“आठवी पास असल्याचा मला अभिमान आहे ..” ; NARENDRA MEHATA यांनी दिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss