Rutuja Latke : मनपाचा ऋतुजा लटकेंना झटका, भ्रष्टाचाराचे आरोप करत हायकोर्टात युक्तिवाद सुरूच

Rutuja Latke : मनपाचा ऋतुजा लटकेंना झटका, भ्रष्टाचाराचे आरोप करत हायकोर्टात युक्तिवाद सुरूच

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा पेच आज सुटण्याची शक्यता आहे. ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेत लिपिक पदावर नोकरीस आहेत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, मुंबई महापालिकेने अद्यापही हा राजीनामा मंजूर केला नाही. त्याविरोधात आता शिवसेना ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली आहे. हायकोर्टात आज सुनावणी सुरु असून आजच निर्णय अपेक्षित आहे.

हेही वाचा : 

मुंबईत रविवारपासून जमावबंदी

दुपारी जेवणाच्या ब्रेक नंतर हायकोर्टात पुन्हा सुनावणीला सुरुवात झाली. यावेळी महापालिकेनं हायकोर्टाच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की, ऋतुजा लटकेंविरोधात एक तक्रार असून ती अद्याप प्रलंबित आहे. एका तक्रारदारानं लटकेंच्या विभागीय चौकशीची मागणी केली आहे. लटके यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या सर्व प्रकाराची चौकशी आम्ही करत आहोत. शिवाय लायसनिंगच्या एका प्रकारात त्यांनी लाच मागितल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. त्यामुळं मुंबई महापालिके युक्तीवाद करत आहे की आम्ही त्यांचा राजीनामा मंजूर का केलेला नाही.

लटकेंविरोधातील चौकशी सुरु राहिलं तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर तुम्ही भरु शकता तो तुमचा निर्णय आहे. पण लटकेंच्यावतीनं सांगण्यात येत आहे की जोपर्यंत माझा राजीनामा मंजूर होत नाही तोपर्यंत मी अर्ज भरु शकत नाही.

Flipkart Diwali Sale: iPhone वर भरगोस ऑफर्स तर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ८० टक्के सूट जाणून घ्या सेलची अंतिम तारीख

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. बुधवारी शिवसेना ठाकरे गटाने महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भेट घेतली. त्यावेळीही आयुक्तांनी थेट भाष्य करणे टाळले. त्यानंतर शिवसेनेने मुंबई हायकोर्टाने बुधवारी तात्काळ याचिका दाखल केली. या याचिकेवर आज सुनावणी होणार असून आजच हायकोर्ट निकाल देण्याची शक्यता आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि तात्पुरत्या स्वरुपात दोन गट स्थापन झाल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने आमदार दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची घोषणा केली. ऋतुजा लटके यांनी निवडणूक लढवण्यासाठी लिपिक पदाचा राजीनामा महापालिका अधिकाऱ्यांकडे सोपवला. मात्र, महिना उलटून गेल्यानंतरही त्यांचा राजीनामा मंजूर झाला नाही. लटके यांचा राजीनामा मंजूर न करण्यासाठी महापालिकेवर दबाव असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

Hijab Ban : हिजाब प्रकरण ३ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवलं; कोर्टाच्या निकालात मतभिन्नता झालेल्या निर्णय

Exit mobile version