Aaditya Thackeray ‘AU कोण?’ या संदर्भात रिया चक्रवर्तीने फार पूर्वीच सांगितलं होतं; जुना व्हिडीओ झाला पुन्हा व्हायरल

Aaditya Thackeray ‘AU कोण?’ या संदर्भात रिया चक्रवर्तीने फार पूर्वीच सांगितलं होतं; जुना व्हिडीओ झाला पुन्हा व्हायरल

बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणात सीबीआयनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंना काही दिवसांपूर्वीच क्विनचीट दिली. मात्र या प्रकरणावरून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते आणि खासदार राहुल शेवाळेंनी आदित्य ठाकरेंना पुन्हा लक्ष्य केलं. शेवाळेंनी बुधवारी लोकसभेत आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत ठाकरेंवर गंभीर आरोप केलं आहेत. शेवाळेंच्या टीकेला आता ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. रिया चक्रवर्तीची एक जुनी मुलाखत व्हायरल करण्यात आली आहे.

AU या नावाने रिया चक्रवर्तीला ४४ फोन आले. हे AU म्हणजे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे असा आरोप करण्यात आला. या आरोपानंतर आता रिया चक्रवर्तीची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीत AU कोण, याबद्दल रिया चक्रवर्तीने स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा : 

IND vs BAN याआधीही मीरपूरमध्ये दोन कसोटी सामने खेळली आहे टीम इंडिया, जाणून घ्या कसा आहे रेकॉर्ड

आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

विरोधकांनी केलेल्या आरोपांवर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गेल्या अडीच वर्षात असं हाऊस चालताना मी कधीच पाहिलं नाही, सत्ताधारी पक्षच व्हेलमध्ये आंदोलन करतंय, हे आतापर्यंत कधी झालं नव्हतं. आम्ही राज्यपाल हटावची मागणी करत आहोत, त्यांना वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा हा प्रयत्न आहे. घोटाळेबाज, गद्दार मुख्यमंत्र्यांना वाचवण्याचा हा प्रयत्न आहे. एनआयटीचा जो घोटाळा आहे, तो आम्हाला हाऊसमध्ये काढू देत नाहीएत, त्यासाठी हे सर्व सुरु आहे. ३२ वर्षाच्या तरुणाने या खोके सरकारला हलवून ठेवलंय असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

BTS बीटीएस ग्रुपने केला ‘बेशरम रंग’ या गाण्यावर धमाल डान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल

दरम्यान, काल खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी आदित्य ठाकरेंवर केलेले आरोप संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आले आहेत. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राहुल शेवाळे यांच्या आरोपांवर हरकत घेतली. त्यांनी सभापतींकडे विनंती केल्यानंतर संबंधित आरोप संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आले.

Exit mobile version