बुलेट ट्रेनच्या मुद्द्यावरून रोहित पवारांनी लगावला भाजपला टोला, म्हणाले…

बुलेट ट्रेनचा प्रकल्प करण्याऐवजी तो पैसा वेगळ्या गोष्टींसाठी वापरला तर महाराष्ट्राची जास्त प्रगती होईल,

बुलेट ट्रेनच्या मुद्द्यावरून रोहित पवारांनी लगावला भाजपला टोला, म्हणाले…

गुजरात ते महाराष्ट्र असा प्रवास अगदी कमी वेळेत पार करणाऱ्या बुलेट ट्रेनवरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (rohit pawar) यांनी भाजपला (bjp) चांगलेच सुनावले आहे. बुलेट ट्रेनवर मोदी सरकारने केलेल्या खर्चाबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, बुलेट ट्रेनमधून महाराष्ट्रातील लोकं गुजरातला जाणार नाहीत. या प्रकल्पामुळे छोटे-मोठे व्यवसाय जे मुंबईत होणार होते ते आता होणार नाहीत. बुलेट ट्रेनच्या (bullet train) बारा स्टेशनपैकी आठ स्थानके गुजरातमध्ये आहेत. तर महाराष्ट्रात फक्त चार स्टेशन आहेत. ५०८ किलोमीटर पैकी १५५ किलोमीटर फक्त महाराष्ट्रात आहे. बाकी गुजरातला आहे. तसेच बुलेट ट्रेनचा प्रकल्प करण्याऐवजी तो पैसा वेगळ्या गोष्टींसाठी वापरला तर महाराष्ट्राची जास्त प्रगती होईल, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

सूत्र बदलली आणि वेदांता प्रकल्प गुजरातला गेला…

महाविकास आघाडीच्या काळात सर्व गोष्टी फायनल झाल्या होत्या. टॅक्स बेनिफिट, जागेची किंमत आदी सर्व गोष्टी फायनल झाल्या होत्या. पंतप्रधानांसोबतच्या बैठकीनंतर सर्व सूत्रं बदलली आणि वेदांता प्रकल्प गुजरातला गेला. पण फॉक्सकॉन डील अजून फायनल झाली नसेल तर गुजरातला जाणारा हा प्रकल्प महाराष्ट्रात कसा आणता येईल याचा प्रयत्न करावा, असं आवाहन रोहित पवार यांनी केलं आहे.

तसेच गेल्या दहा वर्षात महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न झाला आहे. ही गोष्ट केंद्रातील मोठ्या नेत्यांना बोलू शकत नसाल आणि त्यामुळे महाराष्ट्राचे महत्त्व कमी होत असेल तर काळजी घेण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.

ओबीसी आरक्षणाबद्दल काय म्हणाले रोहित पवार?

यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरही भाष्य केलं. २०१६ साली ओबीसी आरक्षणाच्या विरोधात काही लोक नागपूर खंडपीठात गेले होते. त्यावेळी सत्तेत असणाऱ्या लोकांनी याकडे दुर्लक्ष केलं होतं. महाविकास आघाडीचे सरकार आले आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय विरोधात आला. महाविकास आघाडीचं सरकार ९९ टक्के कामी आलं. आताच्या सरकारने केवळ एक टक्का प्रिंटिंगचं काम केलं. तरीही हे लोक आरक्षणाचं श्रेय घेत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

हे ही वाचा:

चार वार्डचा एक प्रभाग ही पद्धतच चुकीची, राज ठाकरेंची प्रभाग पद्धतीवर टीका

पवारांच्या बालेकिल्ल्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा तीन दिवसीय दौरा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version