BJP चा अंतर्गत सर्व्हे आला समोर लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज; Rohit Pawar यांचा दावा

BJP चा अंतर्गत सर्व्हे आला समोर लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज; Rohit Pawar यांचा दावा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने राज्यात सध्या धामधूम पाहायला मिळत आहे. यंदाची निवडणूक मुख्यत्वे महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) अशी रंगणार आहे. अश्यातच आता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागांसाठी वाटाघाटीच्या चर्चा सुरु होणार आहेत. पण त्याआधीच महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये जागावाटपावरून तुतूमैमै होत असल्याचे दिसत आहे. अश्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मोठा दावा केला असून, “विधानसभा निवडणुकीतदेखील लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्याने भाजपमध्ये अंतर्गत गोटात भीती पसरलीय,” असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

रोहित पायावर यांनी आज (मंगळवार, १० सप्टेंबर) आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून महायुतीवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले, “एका अंतर्गत सुत्राच्या माहितीनुसार परवाच भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला असून त्यामध्ये अजितदादांच्या गटाला ७-११ जागा, शिंदे साहेबांच्या गटाला १७-२२ जागा आणि भाजपला ६२-६७ जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्याने भाजपमध्ये अंतर्गत गोटात भीती पसरलीय. यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत.

भाजपच्या एका मोठ्या केंद्रीय नेत्याने परवा अजितदादांना काही ठराविक जागा ऑफर केल्या असून अजितदादांनी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारसंघातच रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात मोठे नेते उभे केले किंवा अपक्ष उभे करण्याची तयारी दाखवली तर ६ ते ७ जागा अतिरिक्त देण्याचीही ऑफर दिलीय.

कर्जत जामखेड संदर्भात तर “कुछ भी कर के, अभी उसे वही पे रोको”, असं सांगितल्याने कर्जत जामखेडची लढत राज्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि तेवढीच इंटेरेस्टिंग होणार हे नक्की आहे. पण मीही या महाकाय शक्तीसोबत दोन हात करायला सज्ज असून या महायुद्धात कर्जत-जामखेडकर स्वाभिमान आणि निष्ठा काय असते, ते या महाशक्तीला दाखवून देतील, असा विश्वास आहे.

हे ही वाचा:

नागपूर मिहान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यास तातडीने पाऊले उचलण्याचे CM Eknath Shinde यांचे निर्देश

अमित शाहांच्या दौऱ्यात अजित पवार अनुपस्थित…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version