Saturday, July 6, 2024

Latest Posts

Mahayuti सरकारच हे शेवटच अधिवेशन आहे, पुन्हा ते सत्तेत येणार नाहीत: Rohit Pawar

राज्यात वारंवार होणारी पेपरफुटी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिक्त पदांच्या भरतीत सुरु असलेला गैरव्यवहार या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्याचे राज्यपाल रमेश बैंस (Ramesh Bains) यांची भेट घेतली.

राज्यात वारंवार होणारी पेपरफुटी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिक्त पदांच्या भरतीत सुरु असलेला गैरव्यवहार या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज (सोमवार, २४ जून) राज्याचे राज्यपाल रमेश बैंस (Ramesh Bains) यांची भेट घेतली. त्यानांतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर (Maharashtra Government) टीका करत “महायुतीच्या (Mahayuti) सरकारच हे शेवटच अधिवेशन आहे, पुन्हा ते सत्तेत येणार नाहीत,” असे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी “दोन दिवसात मोठा गौप्यस्फोट करणार” असे विधान केले आहे, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

रोहित पवार यांनी यावेळी विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, “दोन दिवसात मोठा गौप्यस्फोट करणार आहे. हे महायुती सरकारच शेवटचं अधिवेशन आहे. पुन्हा ते सत्तेत येणार नाहीत. त्यामुळे कदाचित सत्तेत असणाऱ्या आमदारांना खुश करण्यासाठी भरघोस निधी दिला जाऊ शकतो. महायुतीत गोंधळात गोंधळ चालू आहे. या विधानपरिषद निवडणुकीत त्यांचे उमेदवार आहेत तरी किती हे सुद्धा लोकांना माहिती नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील पैशांचा वापर महायुतीच्या उमेदवारांकडून केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे,” असे ते म्हणाले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदभरतीत सुरु असलेला गैरप्रकार आणि विद्यापीठात वारंवार निर्माण होत असलेली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती रोखण्याबाबत कठोर पावलं उचलण्याचे आदेश सरकारला देण्याची विनंती महामहिम राज्यपाल रमेश बैस यांना भेटून केली आणि याबाबतचं पत्र रोहित पवार यांनी त्यांना दिले. याबाबत ते म्हणाले, “माझ्या मतदारसंघातील राज्यपालांच्या अंतर्गत असणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या हिताच्या काही विषयांसाठी राज्यपालांची भेट घेतली. केंद्र सरकारने केलेला पेपर फुटीचा कायदा महाराष्ट्रात होण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. उत्तराखंड मध्ये जसा तेथील राज्यपालांनी पुढाकार घेऊन उत्तराखंड मध्ये कायदा केला तसाच या अधिवेशनात आपल्या राज्यपालांनी पुढाकार घेतला पाहिजे किंवा राज्य सरकारला तो कायदा करण्यासंबंधी सूचना केल्या पाहिजे अशी विनंती केली. राज्यातील महामंडळांना या अधिवेशनात २०० कोटींचा निधी मिळाला पाहिजे अशी मागणी केली. माझ्या मतदार संघातील एमआयडीसी चा मुद्दा सरकारने शब्द देऊन सुद्धा अजून पूर्ण केला नाही.त्यामुळे सरकार जर चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर राज्यपालानी लक्ष घातलं पाहिजे. पुणे विद्यपीठातील 60% पेक्षा अधिक जागा रिक्त आहेत.त्यामुळे मराठीच्या शिक्षकाला इंग्रजी शिकवावं लागत अशी परिस्थिती पुणे विद्यापीठात आहे.”

हे ही वाचा

Cm एकनाथ शिंदेच्या “त्या” आमदारांना मिळणार का मंत्रिमंडळात स्थान?

तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचेही सरसकट कर्ज माफ करा: Nana Patole

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss