ट्रिपल इंजिन सरकारवर रोहित पवारांचा हल्लाबोल, आमदार रोहित पवार

भाजप सत्तेत आहे, पण खऱ्या अर्थाने याचा राजकीय अभ्यास केला तर जाणवेल, भाजप निशाणा वेगळ्याच सत्ताधारी पक्षाला करतंय मात्र टार्गेट दुसऱ्याच सत्ताधारी पक्षाला करत आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

ट्रिपल इंजिन सरकारवर रोहित पवारांचा हल्लाबोल, आमदार रोहित पवार

भाजप सत्तेत आहे, पण खऱ्या अर्थाने याचा राजकीय अभ्यास केला तर जाणवेल, भाजप निशाणा वेगळ्याच सत्ताधारी पक्षाला करतंय मात्र टार्गेट दुसऱ्याच सत्ताधारी पक्षाला करत आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

रोहित पवार म्हणाले, मुख्यमंत्री लॉबीमध्ये नसतानाच अध्यक्षांनी जरांगे पाटलांची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, असे घोषित केले. यामध्ये भाजप कोणाला टार्गेट करतंय आणि या चौकशीतून ज्या गोष्टी समोर येतील, त्याचा कोणाला त्रास होईल, हे येत्या काही दिवसांतच समजून येईल. भाजपने मराठा आरक्षणाबाबत कधीही प्रतिक्रिया दिलेली नाही. धनगर आरक्षणाबाबत सुद्धा दुटप्पी भूमिका भाजपची आहे असेही रोहित पवार म्हणाले. पुढे रोहित पवार म्हणाले की, भाजप खूप हुशार पक्ष आहे. जवळच्या लोकांना जवळ करुन कधी त्यांच्यावर हल्ला करेल, हे काही सांगता येणार नाही. त्यामुळे एसआयटी कोणामुळे, कशासाठी फॉर्म केली हे बघावं लागेल. पण जर जरांगे पाटलांसारख्या सामाजिक कार्यकर्त्यावर तुम्ही एसआयटीमार्फत चौकशी करताय, तर याचा विचार भाजपने केला पाहिजे असे रोहित पवार म्हणाले. यावर सविस्तर बोलताना रोहित पवार पुढे म्हणाले, २०१९ ला भीमा-कोरेगाव दंगल झाली, त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपलाच झाला. त्यावेळीही भीमा-कोरेगाव झाल्यानंतर काही दिवसांवरच लोकसभा निवडणूक होती. आताही तसेच आहे. लोकसभा निवडणूक काही महिन्यांवरच आहे. त्यातच ओबीसी विरुद्ध मराठा हे वातावरण मुद्दाम तयार केले गेले आहे का? अशी चर्चा लोकांमध्ये आहे आणि आम्हालाही तसेच वाटत आहे. आम्हाला वाटतंय की हा वाद मुद्दाम आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी तयार करण्यात आला आहे. मात्र या सगळ्यामध्ये मुलभूत प्रश्‍नांकडे कोणी लक्ष देत नाही, हे दुर्दैव आहे असेच रोहित पवार म्हणाले. एसआयटी फॉर्म करण्याचं कारण एवढंच आहे की कोणत्यातरी एका पक्षाला टार्गेट केले आहे, मग उद्या कदाचित ती माहिती गोळा झाल्यानंतर जो सत्तेत आहे, त्या पक्षाला दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून होवू शकतो, असे आम्हाला वाटत आहे. आजपर्यंत हजारो एसआयटी चौकशा झाल्या, पण त्यांचे निकाल आजपर्यंत आले नाहीत. बीडमध्ये झालेल्या दंगलीमध्ये आमचे स्पष्ट मत आहे की, या सत्तेत असलेल्या लोकांनीच ही दंगल घडवली. याबाबत आम्ही ज्युडिशीयल चौकशीची मागणी करीत होतो. मात्र, तसे न होता. या दंगलीचा तपास एसआयटीकडे देण्यात आला. आता एसआयटीचा निकाल कधी लागेल, हे पहावे लागेल. मात्र, बीडमध्ये जे घडले ते सत्तेतीलच लोकांनी घडवले हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे, असेही रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार म्हणाले की, सरकारने जे दहा टक्के आरक्षण दिले त्याबाबत अनेक प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. अभ्यास न करता दिलेले आरक्षण कोर्टात टिकू शकणार नाही हे जाणल्यामुळेच फक्त जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी सत्ताधार्‍यांनी चालवलेला हा खटाटोप आहे, असे रोहित पवार म्हणाले. रोहित पवार म्हणाले, गेल्या ५० वर्षामध्ये भाजपबाबत बोलायचे तर शरद पवार यांच्या विरोधात बोलल्याशिवाय भाजपच राजकीय दृष्टीकोनातून कधीही भलं झालेले नाही. त्याचदृष्टीकोनातून वेगळं वातावरण निर्माण करावे, म्हणून हे भाजपचे नेते त्याबाबतीत बोलत असावे. एकच सांगतो की, कोणाचा करेक्ट कार्यक्रम होईल हे मी इथे सांगणार नाही, पण सामान्य लोकं लोकशाहीच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीत या जातीयवादी आणि धर्मवादी सरकारचा भाजप आणि त्याच्या मित्रपक्षाचा करेक्ट कार्यक्रम १०० टक्के करतील असा ठाम विश्वास रोहीत पवार यांनी व्यक्त केला. रोहित पवार म्हणाले, भाजपला जे हवं होतं ते त्यांनी केले आहे. अजित पवारांचा वापर हा भाजपने केलेला आहे. गेल्या अनेक वर्षात शरद पवार साहेब असतील किंवा पवार कुटुंबीय यांनीच पुरोगामी विचार या महाराष्ट्रात टिकावा यासाठी संघर्ष केला. त्यामुळे भाजपला अनेकदा अडचणीत यावे लागलं आणि मग पवार विरुद्ध पवार केल्यामुळे भाजपला जास्त फायदा होतोय. बारामती लोकसभेच्या बाबतीत बोलायचे तर, त्यामध्ये जो काही निकाल लागेल त्यात भाजपला जे हवे पवार विरुद्ध पवार झालेले आहे. शेवटी त्यांनी कितीही चाणक्यशाहीचा प्रयत्न केल तरी सामान्य लोकं नक्कीच निकाल हा पुरोगामी विचारांच्या आणि शरद पवार यांच्या बाजूने देतील असा विश्वास व्यक्त केला.

 

रोहित पवार म्हणाले, आज अजित पवार त्याबाबतीत निर्णय घेतील. अजित पवार यांचा आता वेगळा पक्ष आहे. चोरलेला का होईना पण त्यांचा एक वेगळा पक्ष आहे अशी खोचक टोलाही लगावला. त्यामुळे ते तिथे जी भूमिका घेतील, जो उमेदवार देतील तोच उमेदवार त्यांच्याकडून फायनल असेल असे ते म्हणाले. सुमित्रा पवार म्हणाल्या आहेत. ज्याप्रकारे अजित पवारांनी बारामतीचा विकास केला त्याप्रकारे अजित दादांचा जो कोणी उमेदवार असेल, त्याला तुम्ही जास्तीत जास्त प्रकारे निवडुन द्या. तरच तुम्हाला इथे पुनर्विकास पाहायला मिळेल. अजित पवार यांनी जो विकास केला तो कसा केला, काय केला त्याच्यामध्ये शरद पवार साहेब यांचे योगदान होते की नव्हते? हे लोकांना माहित आहे. असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मराठा आरक्षणाचं विधेयक आणलं होतं. आता हे विधेयक राज्यपालांकडे गेले की नाही तेही बघावे लागले. पूर्वी काँग्रेसच्या काळात १६ टक्के आरक्षण दिलेले होते. भाजपने ते १३ टक्क्यांवर आणलं होतं आता ते १० टक्क्यांवर आणलं आहे. खरंतर यावर अभ्यास व्हायला हवा होता. केंद्र सरकारच याबाबतीत मार्ग काढू शकतं. कारण हे बिल कोर्टात टिकेल की नाही याची अनेकांना शंका आहे. कोर्टात टिकवायचे असेल तर केंद्र सरकारला विश्वासात घेतले असते तर ट्रिपल इंजिन सरकार आहे तर मग कदाचित योग्य ठरु शकले असते. कदाचित हा विषय घेण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर त्यांनी केले नाही, कदाचित त्यांचे धाडस झाले नसावे असेही रोहित पवार म्हणाले.

हे ही वाचा:

फक्त आजच नाही तर ३६५ दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा व्हायला हवा – Raj Thackeray

मुंबईत आज पाणीपुरवठा बंद; काही भागात १०० टक्के तर ३० टक्के पाणीपुरवठा बंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version