spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘पण त्याआधी जे घडलं ते निंदनीय…’,अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपच्या माघारीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर येथे चांगलेच ट्विस्ट पाहायला मिळाले. अखेर निवडणुकीतून अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्यादिवशी भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी अर्ज माघारी घेतला. अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘मेघदूत’ बंगल्यावर रविवारी रात्री उशिरा बैठक झाली. या बैठकीला आशिष शेलार आणि अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार मुरजी पटेल उपस्थित होते. मुरजी पटेल हे निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम होते. आपली पूर्ण तयारी झाल्याचं पटेल यांनी सांगितलं. तर आशिष शेलार यांचाही पोटनिवडणूक लढवण्याचा आग्रह होता. मात्र, अखेर सी. टी. राव यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर भाजपने उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे, आता, ऋुतुजा लटके यांचा विजय सोपा झाला आहे.

हेही वाचा : 

Raj Thackeray: भाजपच्या मतपरिवर्तनानंतर राज ठाकरेंनी मानले फडणवीसांचे आभार

रोहित पवार यांनी म्हटलं

रोहीत पवार यांनी अंधेरी पोटनिवडणुकीवरून भाजपाला टोला लगावला आहे. आता अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध होईल, असं चित्र दिसतंय. पण त्याआधी जे घडलं ते निंदनीय आहे. त्यांनी आधीच ही पोटनिवडणूक बिनविरोध करतोय असं जाहीर केलं असतं तर महाराष्ट्राची परंपरा जपली गेली असती असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

ग्रामपंचयात निकालावर प्रतिक्रिया

दरम्यान यावेळी बोलताना रोहित पवार यांनी आतापर्यंत हाती आलेल्या ग्रामपंचायतींच्या निकालावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकासआघाडीला यश मिळत आहे. हे सध्याच्या चित्रावरून दिसतंय. संध्याकाळपर्यंत हेच चित्र कायम राहील. जनतेच्या मनात काय आहे, त्यांना पक्षीय घडामोडी पचनी पडल्या नाहीत, हे निकालातून स्पष्ट दिसतंय असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीतून मुरजी पटेलांनी माघार घेतल्यानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया

Latest Posts

Don't Miss