आजोबांच्या टीकेवर रोहित पवार यांचे बावनकुळेंना सडेतोड उत्तर

शरद पवार हेच राष्ट्रवादीमधील भोंदूबाबा आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला आहे. जादूटोणा करण्यात आल्यामुळे उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादीच्या जाळ्यात अडकल्याची टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे State President of BJP Chandrasekhar Bawankule) यांनी केली आहे.

आजोबांच्या टीकेवर रोहित पवार यांचे बावनकुळेंना सडेतोड उत्तर

शरद पवार हेच राष्ट्रवादीमधील भोंदूबाबा आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला आहे. जादूटोणा करण्यात आल्यामुळे उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादीच्या जाळ्यात अडकल्याची टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे State President of BJP Chandrasekhar Bawankule) यांनी केली आहे. यानंतर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी सोशली मीडियावरुन सडेतोड उत्तर दिले आहे.

रोहित पवार म्हणले आहेत कि, अंधश्रद्धा व जादूटोणाविरोधी कायदा ज्यांच्यामुळे संमत झाला त्या डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या साताऱ्यात भाजप प्रदेशाध्यक्षांची जादूटोण्याची भाषा पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी आणि महाराष्ट्राचा व या कायद्याचा अवमान करणारी आहे. शिवाय जादूटोणाविरोधी कायद्यालाच हे आव्हान आहे. आता याबाबत राज्य सरकार काय करतं याकडं सर्वांचं लक्ष लागलंय! राज्यातले प्रकल्प गुजरातला नेऊन प्रगतीच्या बाबतीत महाराष्ट्राला मागं आणण्याचा प्रयत्न तर भाजपकडून सातत्याने होतच आहे, पण विचारांच्या बाबतीतही महाराष्ट्राला मागं आणण्याचा त्यांचा डाव स्पष्ट दिसतोय.

तसेच शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव यांनी देखील टीका केली आहे. एका बाजूला राजकारणातील कटुता संपवायची आहे असं म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला जर भाजपचे नेते अशी वक्तव्ये करत असतील तर त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचे टीका शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव यांनी केली.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले ?

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे State President of BJP Chandrasekhar Bawankule) आज साताऱ्यात होते. तिथे त्यांनी उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यानंतर त्यांची साताऱ्यात पत्रकार परिषद झाली. तिथे बोलताना त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीवर कठोर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला असून त्यामुळेच ते त्यांच्यासोबत असल्याची खोचक टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रखेखर बावनकुळे यांनी केली आहे.

बावनकुळे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसने आता सत्तेत येण्याचं स्वप्न बघणं सोडलं पाहिजे. बेईमानीतून सत्ता बनवण्याचा प्रयत्न अडीच वर्षांपूर्वी केला होता. उद्धव ठाकरेंवर एक प्रकारे जादूटोणा करण्यात आला होता. त्यात उद्धव ठाकरे फसले आणि विचार न करता राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले. हा जादूटोणा राष्ट्रवदीने केला. मात्र आता आम्ही सतर्क झालो आहोत.” उद्धव ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने एक प्रकारचा जादूटोणा केला. त्यात उद्धव ठाकरे अडकले. त्यातूनच त्यांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही आता सतर्क असून सरकार पुन्हा निवडून आणू असेही बावनकुळे यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात २०० हून आमदार निवडून आणणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पक्षातील भोंदूबाबाच्या ताब्यात कोणं आलं तर तो सुटत नाही असं सांगितले. भोंदूबाबा कोण आहे हे सगळ्यांना माहीत आहे. पुन्हा ते सांगण्याची गरज नाही असे म्हणत एकदा शरद पवारांच्या ताब्यात कोणी आला तर तो सुटत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

हे ही वाचा : 

PM मोदी ‘मिशन दक्षिण’निमित्त, ४ राज्यांना भेट देणार, २५ हजार कोटींहून अधिक किमतीचे प्रकल्पांचा शुभारंभ

दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेता मुंबईत ड्रोन उडवण्यावर बंदी, मुंबई पोलिसांचे आदेश जारी

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version