रोहित पवार यांचा सूचक ट्विट, सत्ताधारी आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता…

रोहित पवार यांचा सूचक ट्विट, सत्ताधारी आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता…

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नुकताच एक ट्विट करत सर्वांचं लक्ष वेधले आहे. रोहित पवार यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत त्यांच्या एका अनुभवाबद्दल सांगितलं आहे. रोहित पवार (MLa Rohit Pawar) म्हणाले आहेत की, “सत्ताधारी पक्षातील अनेक सहकारी आमदारांशी त्यांची कामानिमित्त मुंबईत भेट झाली तेव्हा आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता होती” हे रोहित पवार यांच्या निरीक्षणास आले असून त्यांनी त्यांच्या ट्विट मध्ये लिहिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे कायम चर्चेत असतात. रोहित पवार हे कायम ट्विटरवर सक्रिय असताना पाहायला मिळाले आहे. ते अनेक विषयांवर भाष्य देखील करताना आढळले आहे. अलीकडेच आसामच्या मुख्यमंत्र्यांनी भीमाशंकर ज्योतिलिंग हे पुण्यात नसून आसाममध्ये असल्याचे सांगितले होते. या वक्तव्यावर रोहित पावर यांनी ट्विट करत प्रतिउत्तर दिले होते. आता रोहित पवार यांची काल मुंबईत सहकारी आमदारांशी भेट झाली होती. त्या प्रसंगाबद्दल रोहित पवार यांनी सूचक ट्विट केलं आहे. रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की “भूकंपापूर्वी प्राणी आणि पक्षांचं वर्तन बदलत असतं… एकप्रकारे ती भूकंपाची पूर्वसूचनाच असते…असंच एक वेगळ्या प्रकारचं माझं निरीक्षण आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक सहकारी आमदारांची कामानिमित्त मुंबईत असताना भेट झाली. त्यावेळी काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्याचे रोहित पवारांनी म्हटलं आहे. या आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि बॉडी लँग्वेज पडलेली होती. सत्ताधारी असूनही काही आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटता येत नसल्याचं समजलं. शिवाय अर्थ विभागातून विशिष्ट पक्षाच्याच फायली मंजूर होत असून त्याचा वेगही अचानक वाढल्याचं समजलं. ही कोणत्या भूकंपाची चिन्ह असावीत?” असे रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विट मध्ये लिहिलं आहे.

अलीकडेच आसामच्या मुख्यमंत्र्यांनी दावा केला होता की “भीमाशंकर ज्योतिलिंग हे पुण्यात मान्सुन आसाममध्ये आहे “. या दाव्यावर रोहित पावर यांनी ट्विट करत प्रतिउत्तर दिल होत. तसेच “राज्यात #बदला घेण्याचा कट आखण्यासाठी गुवाहाटीला जाऊन आसामच्या मुख्यमंत्र्यांचा पाहुणचार घेणारे या दाव्याचा कसा ‘बदला’ घेतात, याची महाराष्ट्र वाट पाहतोय…” असे पाहतात राज्यातील शिंदे सरकारवर निशाणा साधला होता.

हे ही वाचा : 

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आव्हाड यांच्या पत्नींनी दिली प्रतिक्रिया

केंद्र सरकार महागाई कमी करून देणार सर्वसामान्यांना दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version