spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राऊतांच्या जामीनावर रोहीत पवारांच्या ट्विटची चर्चा तर सुषमा अंधारेंनी दिली पहिली प्रतिक्रिया’ ‘टायगर इज बॅक’

शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut bail News) यांना जामीन मंजूर झाला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर अनेकांनी ट्विटर वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut bail News) यांना जामीन मंजूर झाला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर अनेकांनी ट्विटर वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अखेर १०० दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushna Andhare) यांनी ट्विट करत न्यायलयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी देखील एक व्हिडिओ शेअर केला आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. विशेष पीएमएल न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर सोशल मीडियावर सत्यमेव जयते…. वाघ परत येतोय … Tiger is back… कोण आला रे कोण आला. अशा पोस्ट व्हायरल होत आहे. शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक ट्विट केले आहेआणि त्या ट्विट मध्ये त्यांनी ‘टायगर इज बॅक’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

 तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी देखील सत्यमेव जयते! लिहून एक व्हिडीओ ट्विट केला आहे. ज्यामध्ये पिंजऱ्यातून वाघ बाहेर येताना दिसत आहे.

 संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर आदित्य ठाकरे यांना विचारलं असता ते म्हणाले की, “संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक तर आहेतच, बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत. उगाचच नाव लावून फिरत नाहीत, मुखवटे लावून फिरत नाहीत. त्यांच्यावरही दबावतंत्र वापरलं पण त्यांनी गद्दारी केली नाही. ते पळून गेले नाहीत. ते डरपोक नाहीत हे लोकांसमोर आलं आहे. जे डरपोक होते ते पळून गेले. मी आता तेच सांगितलं जे कोणी सत्तेविरोधात आवाज उठवतात, सरकारविरोधात बोललं की दबावतंत्र वापरलं जातं. आज राजकीय लोकांवर कारवाई होते, उद्या ज्यांना ते एचएमव्ही बोलतात त्यांच्यावरही कारवाई होईल ही देशासाठी धोक्याची घंटा आहे.” असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.

पत्रचाळ प्रकरण काय?

मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे ३ हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी ६७२ फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु २०१० मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर २०११ , २०१२ आणि २०१३ मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.

हे ही वाचा :

Sanjay Raut : मोठी बातमी : अखेर संजय राऊत यांना जामीन मंजूर

Sanjay Raut Bail : संजय राऊत डरपोक नाहीत, जे डरपोक होते ते पळून गेले ; आदित्य ठाकरे

Sanjay Raut Bail : संजय राऊतांच्या जामिनावर आज निर्णय, ठाकरेंची तोफ तुरुंगाबाहेर येणार का?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss